ETV Bharat / bharat

Maoist Surrender In Odisha ओडिसामध्ये शहीद स्तंभ नेस्तनाबूत करत माओवादी समर्थकांचे आत्मसमर्पण

author img

By

Published : Aug 23, 2022, 6:29 PM IST

ओडिसामध्ये 150 माओवादी समर्थकांनी आत्मसमर्पण केले आहे. तत्पुर्वी त्यांनी शहीद स्तंभ तोडला आहे. यामध्ये 150 माओवादी समर्थकांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. Maoist Surrender In Odisha ही घटना स्वाभिमान अंचल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रालेगडा ग्रामपंचायत भागात घडली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

मालकानगिरी - ओडिसातील मालकानगिरी जिल्ह्यातील जवळजवळ 150 माओवादी समर्थकांनी नक्षलवाद्यांनी बनवलेला शहीद स्तंभ उध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि सीमा सुरक्षा बलासमोर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. Maoist Supporters Surrender In Odisha ही घटना रालेगडा ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे, ज्याला सध्या स्वाभिमान अंचल असे म्हटले जाते. हा पहिला माओवादींचा किल्ला होता. हे क्षेत्र संपूर्णपणे पाण्याने वेढलेले असून, बाजूचा इतर भाग हा दाट जंगलात आहे.

आम्ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करत आहोत सोमवारी दि. 22 ऑगस्ट रोजी माओवादी समर्थकांनी प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्षातील सदस्यांची मदत न करण्याची शपथ घेतली. मलकानगिरीचे पोलीस अधिक्षक यावेळी म्हणाले की, हा ओडिसा पोलिसांच्या घर वापसी उपक्रमाचा एक भाग आहे. त्या अंतर्गत माओवादग्रस्त गावांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे. तसेच, विकासाला गती देण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी आम्ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करत आहोत असही ते यावेळी म्हणाले आहेत.

माओवादी मूर्दाबादचे नारे अधिकाऱ्यानी सांगितले, की शेजारच्या आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत असलेले माओवादी या ठिकाणी आश्रय घेत होते. कारण हा भाग सुरक्षा कर्मचार्‍यांसाठी दुर्गम होता. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जुलै 2018 मध्ये परिसरातील जानबाई नदीवरील गुरुप्रिया पुलाचे उद्घाटन केले होते. 2019 मध्ये 15 वर्षांनंतर पहिल्यांदा निवडणुका झाल्या होत्या. या काळात दिवसा आत्मसमर्पण करणाऱ्यांनी पुतळे आणि माओवादी साहित्य जाळल्याच्याही घटना तसेच, माओवादी मूर्दाबादचे नारे लावल्याच्याही घटना घडल्या होत्या.

इतर 397 माओवादी समर्थक मुख्य प्रवाहात सामील बीएसएफचे मुख्य उप महानिरीक्षक डीआयजी एस. के. सिन्हा म्हणाले की, सुरक्षा कर्मचार्‍यांच्या भक्कम उपस्थितीमुळे माओवाद्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पोलीस आणि बीएसएफने मुख्य प्रवाहात परत येण्याची शपथ घेतलेल्या लोकांना स्पोर्ट्स किट, साड्या , कपडे आणि इतर सामनाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांना रोजगार कार्ड देखील उपलब्ध करून दिले आहेत. यापूर्वी 2 जूनला मलकानगिरीमध्ये 50 माओवादी समर्थकांनी ओडिसाच्या डीजीपीसमोर आत्मसमर्पण केले होते. नऊ दिवसांनंतर, इतर 397 माओवादी समर्थक मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.

हेही वाचा - Tushar Gandhi जिवंत गांधी खटकणाऱ्यांना मारलेले गांधी जास्तच त्रास देत आहेत, तुषार गांधींंचा भाजपला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.