India First Covid Nasal Vaccine : भारत बायोटेकची कोविड लस 'इन्कोव्हॅक' लाँच, नाकातून देता येणारी पहिली भारतीय लस ठरणार गेम चेंजर

author img

By

Published : Jan 26, 2023, 7:54 PM IST

India First Covid Nasal Vaccine
इन्कोव्हॅक लाँच करताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय ()

भारत बयोटेकची बहुचर्चित इन्कोव्हॅक लस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत लाँच केली आहे. नाकातून देण्यात येणारी इन्कोव्हॅक ही जगातील पहिली भारतीय लस आहे. त्यामुळे ती ग्लोबल गेम चेंजर ठरणार असल्याची माहिती भारत बायोटेकच्या वतीने देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारत बायोटेकने नाकातून देण्यात येणारी जगातील पहिली कोविड लस 'इन्कोव्हॅक' लाँच केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनानिमित्त ती लॉन्च करण्यात आली. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय औषध नियंत्रक जनरल (DCGI) कडून नोव्हेंबरमध्ये हेटरोलॉजस बूस्टर डोसच्या रूपात प्रौढांसाठी मर्यादित वापरासाठी मंजुरी मिळाली होती. ही लस गेम चेंजर असल्याची माहिती भारत बायोटेकच्या वतीने देण्यात आली आहे.

तीन टप्प्यात झाले यशस्वी परिणाम : इन्कोव्हॅक ही लस भारत बायोटेक या कंपनीने बनवली आहे. भारत बायोटेकने यापूर्वी दिलेल्या निवेदनानुसार, इन्कोव्हॅकची किंमत खाजगी क्षेत्रासाठी 800 रुपये आहे. तर भारत सरकार आणि राज्य सरकारला पुरवठ करण्यासाठी याची किंमत 325 रुपये आहे. हेटरोलॉगस बूस्टर डोसमध्ये, बूस्टर डोस प्राथमिक डोसपेक्षा वेगळा दिला जाऊ शकतो. भारत बायोटेक ही हैदराबादची कंपनी आहे. या लसीचे तीन टप्प्यांत क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी परिणाम झाले असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

28 दिवसांच्या अंतराने दोन डोस : इन्कोव्हॅक या लसीचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने द्यावे लागतात. कोविन वेबसाइटवर इंट्रानासल लसीच्या डोससाठी अपॉइंटमेंट बुक करावी लागत असल्याची माहिती लस उत्पादक भारत बायोटेकच्या वतीने देण्यात आली आहे. ही लस वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, सेंट लुईस यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आली आहे. भारत बायोटेकने प्रीक्लिनिकल सेफ्टी मूल्यांकन, मॅन्युफॅक्चरिंग स्केल अप, फॉर्म्युलेशन आणि डिलिव्हरी डिव्हाइस डेव्हलपमेंटसाठी मानवी क्लिनिकल चाचण्या देखील घेतल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाच्या कोविड संरक्षण कार्यक्रमाद्वारे उत्पादन विकास आणि क्लिनिकल चाचण्यांना अंशतः भारत सरकारने निधी दिल्याची माहिती भारत बायोटेकने दिली आहे.

इन्कोव्हॅक ग्लोबल गेम चेंजर : इंट्रानासल लसीचे 'ग्लोबल गेम चेंजर' असल्याची माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ कृष्णा एला यांनी दिली. ते म्हणाले 'इंट्रानासल लस तंत्रज्ञान आणि वितरण प्रणालीमध्ये जागतिक गेम चेंजर आहे. इन्कोव्हॅकची मान्यता जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भविष्यातील संसर्गजन्य रोगांसाठी तंत्रज्ञानासह चांगल्या प्रकारे आम्ही तयार आहोत याची खात्री करण्यासाठी आम्ही इंट्रानासल लसींमध्ये उत्पादन विकास चालू ठेवल्याचे ते म्हणाले.

भारत बायोटेक अग्रगण्य लस उत्पादक कंपनी : भारत बायोटेक ही एक जागतिक पातळीवर अग्रगण्य लस उत्पादक कंपनी आहे. आजपर्यंत 7 अब्जाहून अधिक डोसचे उत्पादन कंपनीने केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा एला यांनी भारताने केवळ महामारीच्या आव्हानांमध्येच स्वत:ची सेवा केली नाही. तर 150 हून अधिक देशांना लस आणि औषधे वितरीत केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. इंट्रानेजल कोविड वैक्सीनच्या सोबत आम्हाला जागतिक स्तरावर गुणवत्तेसह नागरिकांचे आरोग्य स्वस्थ ठेवण्याचीही जबाबदारी आम्ही पार पाडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Flag Hoisting In Ambazari Lake : सलग चौथ्या वर्षी दृष्टिहीन ईश्वरीसह टीमने केले अंबाझरी तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.