ETV Bharat / bharat

बायकोला ठार मारण्यासाठी या नवऱ्याने केले असे काही, की तपासयंत्रणाही पडल्या बुचकळ्यात

author img

By

Published : Oct 11, 2021, 5:55 PM IST

Updated : Oct 12, 2021, 12:06 PM IST

केरळ राज्यातील कोल्लम येथे कोब्रा चावलाने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना 7 मे 2020 रोजी घडली होती. मात्र तिच्याच पतीने पत्नीची हत्या करण्यासाठी तिच्या रूममध्ये कोब्रा सोडला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी असल्याचे घोषित केले आहे.

Man who used a snake to kill his wife, convicted
धक्कादायक : रुममध्ये क्रोबासोडून केली पत्नीची हत्या

कोल्लम - केरळ राज्यातील कोल्लम येथे कोब्रा चावलाने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना 7 मे 2020 रोजी घडली होती. मात्र पोलीस तपासाअंती असे निष्पन्न झाले आहे की, तिच्याच पतीने पत्नीची हत्या करण्यासाठी तिच्या रूममध्ये कोब्रा सोडला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी असल्याचे घोषित केले आहे. याप्रकरणावर बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.

सत्र न्यायाधीश एम मनोज म्हणाले की, सूरज विरोधातील खटल्यातील संशयास्पद सर्व आरोप हे सिद्ध झाले आहेत. त्याने विषारी सापाच्या साह्याने पत्नीची हत्या केल्याचा आरोप हा मुख्य आरोप हा सिद्ध झाला आहे.

पतीने पाहिले सापाला पकडण्याचे व्हिडिओ -

पत्नी उथराला मारण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आरोपी सूरज याने युटूबवर साप हाताळण्याचे व्हिडिओ पाहिले होते. त्याने मार्च 2020 मध्ये सुद्धा आरोपीने मृत महिलेच्या खोलीत कोब्रा साप सोडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्याचा प्लॅन फसला होता, असे पोलिसांनी सांगितले.

बचाव पक्षाच्या वकिलाने युक्तिवाद असे म्हटले आहे की, या प्रकरणात सूरजला चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवण्यात आले होते आणि उथराचा मृत्यू नैसर्गिक साप चावल्याने झाला होता.

पोलिसांनी आरोपींविरोधात न्यायालयात 1000 पानांचे आरोपपत्र सादर केले होते. सूरजवर कलम 302 (खून), 326 (एखाद्याला इजा करण्यासाठी हानिकारक साहित्य वापरणे), 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण -

कोल्लम जिल्हातील उथरा मृत्यू प्रकरणात न्यायालयाने तिच्या पतीला दोषी ठरवले आहे. दि. 7 मे 2020 रोजी सुरजची पत्नी उथरा ही घरात झोपली असताना त्याने कोब्रा साप घरात सोडला होता. कोब्राने पत्नीला दंश केल्याने चा मृत्यू झाला. पण माहेरच्या मंडळींना सूरजवर संशय असल्याने त्यांनी सूरजवर हत्येचा आरोप केला. याप्रकरणात पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर असे निदर्शनात आले होते की, सूरज याने आपल्या पत्नीच्या खोलीत साप सोडून तिची हत्या केली आहे.

हेही वाचा - 'तुला पप्पांनी बोलावले' म्हणून अल्पवयीन मुलीला बळजबरीने नेले लॉजवर; नराधमाने केले 'असे' दुष्कृत्य

Last Updated : Oct 12, 2021, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.