ETV Bharat / bharat

लोकसभेतील गोंधळावर अध्यक्ष ओम बिर्ला यांची प्रतिक्रिया, काय आहे महाराष्ट्र कनेक्शन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 3:38 PM IST

Parliament Attack : संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. बुधवारी लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकारावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिलं.

Om Birla
Om Birla

नवी दिल्ली Parliament Attack : संसदेच्या सुरक्षेत बुधवारी एक मोठी चूक झाली. दोन तरुणांनी लोकसभेचं कामकाज चालू असताना प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. या दोघांनी सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी पिवळ्या धुराचा वापर केला. यामुळे संपूर्ण सभागृहात पिवळा धूर पसरला. दरम्यान, सभागृहात उपस्थित असलेल्या खासदारांनी या दोघांना पकडलं आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिलं. या घटनेमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत.

  • #WATCH | Lok Sabha security breach | Leader of Congress in Lok Sabha, Adhir Ranjan Chowdhury says "Today itself, we paid floral tribute to our brave hearts who sacrificed their lives during the Parliament attack and today itself there was an attack here inside the House. Does it… pic.twitter.com/maO9tGOZ0l

    — ANI (@ANI) December 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ओम बिर्ला यांची प्रतिक्रिया : आता या घटनेवर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी प्रतिक्रिया दिली. झालेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. "शून्य तासाला घडलेल्या या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात आढळून आलं की, हा केवळ धूर होता. धुराची काळजी करण्याची गरज नाही", असं ओम बिर्ला यांनी सांगितलं. संसदेत घुसलेल्या या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आल्याचं ओम बिर्ला यांनी सांगितलं. त्यांच्याकडील साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.

  • #WATCH | Lok Sabha security breach | Lok Sabha speaker Om Birla says "Both of them have been nabbed and the materials with them have also been seized. The two people outside the Parliament have also been arrested by Police..." pic.twitter.com/0CtsaKR2Rk

    — ANI (@ANI) December 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्र कनेक्शन : जेव्हा या व्यक्तींनी लोकसभेत प्रवेश केला, त्याचवेळी सुरक्षा कर्मचार्‍यांनी सभागृहाबाहेर दोघांना अटक केली. हे दोघेही सभागृहाबाहेर आंदोलन करत होते. त्यांच्याकडून तशाच प्रकारच्या रंगाचे फवारे सापडले आहेत. यापैकी एक महिला होती. तिचं नाव नीलम असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव अमोल शिंदे असून तो लातूरचा आहे. दोघंही 'भारत माता की जय', 'जय भीम', 'हुकूमशाही चालणार नाही' अशा घोषणा देत होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. सुरक्षा यंत्रणा या दोघांची चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

  1. संसदेत राडा! प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी मारल्या उड्या; वाचा नेमकं काय घडलं?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.