ETV Bharat / bharat

Stock Markate: एलआयसीच्या गुंतवणुकदारांनी गमावले 94 हजार कोटी रुपये; वाचा शेअर बाजाराविषयी

author img

By

Published : Jun 6, 2022, 11:07 AM IST

एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने घसरण होत असल्याने गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या बाजार भांडवल मूल्यातही मोठी घसरण झाली आहे.

Stock Markate
Stock Markate

मुंबई - देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीमागील शेअर बाजारातील अडचणी दूर होताना दिसत नाही. एलआयसी कंपनी बाजारात लिस्टिंग झाल्यापासून त्याच्या मागे घसरणीचे सत्र सुरू आहे. मागील 14 ट्रेडिंग सत्रात एलआयसीचे बाजार भांडवल 94 हजार कोटींपेक्षा कमी झाले आहे.

मागील आठवड्यात एलआयसीच्या शेअर दराने शुक्रवारी 800.05 रुपये इतका दर गाठला. हा एलआयसीचा नीचांक आहे. बाजारात लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचा शेअर दर 7.72 टक्के म्हणजे 67 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 5 लाख सहा हजार 126 कोटी रुपयांवर आला आहे. आयपीओनुसार अप्पर बँण्डच्या हिशोबाने एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 6 लाख 242 कोटी रुपये होते. म्हणजेच एलआयसीच्या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना 94,116 कोटींचा फटका बसला आहे.

ब्रोकरेज फर्मने दिला इतका टार्गेट प्राइस - या दरम्यान, ब्रोकरेज फर्म ( Emkay Global ) ने एलआयसीसाठी टार्गेट प्राइस दिली आहे. फर्मने एलआयसीला होल्ड रेटिंगसह 875 रुपयांचे टार्गेट प्राइस दिले आहे. ( Emkay Global ) ने दिलेल्या टार्गेट प्राइसनंतरही आयपीओ गुंतवणुकदारांना फारसा फायदा होणार नाही. ब्रोकरेज फर्मने एलआयसीला हत्ती संबोधत हत्तीकडून नृत्याची अपेक्षा करू नये असे म्हटले होते.

शेअर बाजारातून कमाई - भारतीय शेअर बाजारातून भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) चांगलाच नफा कमावला आहे. एलआयसीने शेअर बाजारातून 42 हजार कोटींचा नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात एलआयसीची ही कमाई झाली आहे. त्याआधी वर्ष (2020-21) मध्ये एलआयसीने 36 हजार कोटींचा नफा कमावला होता.

LIC ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे. एलआयसीच्या अखत्यारीत अब्जावधींची मालमत्ता आहे. त्याशिवाय एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे. एलआयसीकडून जवळपास 25 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते.

हेही वाचा - Rain in Maharashtra: आजपासून पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळणार! वाचा सविस्त कुठे पडणार पाऊस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.