ETV Bharat / bharat

KYC From Home : तुम्ही आता घरबसल्या तुमचे केवायसी अपडेट करू शकता- आरबीआय

author img

By

Published : Jan 8, 2023, 2:08 PM IST

KYC From Home
घरबसल्या तुमचे KYC अपडेट करा

जर तुम्हाला तुमच्या केवायसी मध्ये बदल करायचा असेल तर, आता तुम्हाला बॅंकेला भेट (KYC From Home ) द्यायची गरज नाही. केवायसी माहितीमध्ये बदल न झाल्यास ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा इतर कोणत्याही डिजिटल चॅनेलद्वारे (KYC Process) तुम्ही आपले स्वयं घोषणा पत्रक (Self Declaration) पाठवू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) म्हटले आहे की, 'बॅंक खातेधारकांना यापुढे 'तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या' (केवायसी) तपशील अपडेट करण्यासाठी त्यांच्या बँक शाखांन मध्ये जाण्याची (KYC From Home ) आवश्यकता नाही. जर ग्राहकांनी आधीच वैध कागदपत्रे सबमिट केली असतील आणि तरीही जर का पत्ता बदललेला नसेल, तर ग्राहक ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा इतर कोणत्याही डिजिटल चॅनेलद्वारे (KYC Process) तुम्ही आपले स्वयं घोषणा पत्रक (Self Declaration) पाठवू शकता.

डिजिटल चॅनेलद्वारे पाठवा स्वयं घोषणा पत्रक : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केवायसी अद्यतनांसाठी (Updates) ग्राहकांनी बँक मध्ये जाऊ नये, असे वक्तव्य केल्यानंतर, मध्यवर्ती बँकेने गुरुवारी त्यासाठी शिफारसी जारी केल्या. त्यानुसार केवायसी माहितीमध्ये बदल न झाल्यास ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा इतर कोणत्याही डिजिटल चॅनेलद्वारे तुम्ही आपले स्वयं घोषणा पत्रक पाठवू (Self Declaration) शकता.

सध्याचे नियम : सध्याच्या नियमांनुसार, KYC माहितीमध्ये कोणताही बदल न झाल्यास, री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक ग्राहकाने केलेली स्व-घोषणा (स्वत: केलेला ऑनलाईन विनंती अर्ज) पुरेशी आहे. बँकांना सूचित करण्यात आले आहे की, 'वैयक्तिक ग्राहकांना नोंदणीकृत ईमेल-आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम, डिजिटल चॅनेल (जसे की ऑनलाइन बँकिंग/इंटरनेट यांसारख्या विविध गैर-फेस-टू-फेस चॅनेलद्वारे वैयक्तिक ग्राहकांना अशा स्व-घोषणा करण्याची सुविधा प्रदान करावी. बँकिंग, मोबाईल ऍप्लिकेशन, पत्र, इत्यादी द्वारे हे करता येते. यासाठी बँकेच्या शाखेला भेट देण्याची गरज नाही,' असे त्यात म्हटले आहे.

आरबीआयने बँकांना दिला सल्ला : RBI ने सर्व बँकांना एक सल्लागार (RBI advises banks) देखील जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांना पुन्हा KYC पूर्ण करण्यासाठी बँकेने प्रदान केलेल्या विविध पर्यायांबद्दल माहिती देण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. नवीन अधिसूचनेनुसार, ग्राहकांना नॉन-फेस-टू-फेस चॅनेलद्वारे स्वयं-घोषणा देणे, बँकेच्या शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे किंवा V-CIP द्वारे रिमोट केवायसी पूर्ण करण्याचा पर्याय असेल.

व्हिडिओ द्वारे केवायसीचा मार्ग मोकळा : बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, गुरुवारी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, 'तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या म्हणजेच केवायसी' प्रक्रिया व्हिडिओ मोडद्वारे (RBI Video Customer Identification Process) देखील केली जाऊ शकते. ही प्रक्रिया शाखेत जाण्याव्यतिरिक्त पूर्ण करता येईल. याशिवाय, सेंट्रल बँकेने असेही म्हटले आहे की, केवायसीमध्ये कोणताही बदल न झाल्यास केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्यासाठी ग्राहकाचे 'सेल्फ डिक्लेरेशन' पुरेसे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.