ETV Bharat / bharat

Hartalika Teej 2022 हरितालिका तीजचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी काय आहे घ्या जाणून

author img

By

Published : Aug 20, 2022, 2:56 PM IST

Hartalika Teej
हरितालिका

हरितालिका तीज व्रत 2022 च्या Hartalika Teej 2022 दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात. ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर अविवाहित मुलीही हे व्रत ठेवतात. तर या वर्षी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी सोमवार, २९ ऑगस्ट 2022 रोजी दुपारी ३ २० वाजता सुरू होत असून ही तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवारी, ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ३३ वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या आधारे पाहिले तर हरतालिका तीज Hartalika Teej ३० ऑगस्टला आहे.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका तीज व्रत Hartalika Teej केले जाते. निर्जला व्रत असल्यामुळे हे कठीण व्रतांपैकी एक आहे. विवाहित स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी, संततीप्राप्तीसाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हरतालिका तीजचे व्रत करतात. हरितालिका तीज व्रत 2022 च्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात, ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर अविवाहित मुलीही हे व्रत ठेवतात. तर या वर्षी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी सोमवार, २९ ऑगस्ट 2022 रोजी दुपारी ३ २० वाजता सुरू होत असून ही तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवारी, ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ३३ वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या आधारे पाहिले तर हरतालिका तीज Hartalika Teej ३० ऑगस्टला आहे.

हरतालिका तीज पूजा मुहूर्त २०२२ या दिवशी हरतालिका तीजचे व्रत करणाऱ्या स्त्रिया सकाळी 05 58 ते 08 31 या वेळेत भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करू शकतात. हरतालिका तीजच्या सकाळच्या पूजेसाठी हा शुभ काळ आहे.

हरतालिका तीजला तीन शुभ योग होतात हरतालिका तीजच्या दिवशी तीन शुभ योग आहे. 30 ऑगस्ट रोजी पहाटेपासून मध्यरात्री 12 05 पर्यंत शुभ योग आहे. त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल. या दोन शुभ योगांशिवाय रवि योगही तयार होतो. सकाळी 05 58 ते रात्री 11 50 पर्यंत रवि योग आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी पहाटे 03 31 ते 05 58 पर्यंत असेल.

हेही वाचा Bail Pola 2022 यंदा शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी पोळा, कसा साजरा केला जातो पोळा घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.