ETV Bharat / bharat

Kiren Rijiju Car Accident: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या गाडीला अपघात, सर्वजण सुखरूप

author img

By

Published : Apr 8, 2023, 10:49 PM IST

Updated : Apr 8, 2023, 11:02 PM IST

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या गाडीला जम्मूहून श्रीनगरला रस्त्याने जात असताना किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या संदर्भात रामबन पोलिसांनी सांगितले की, किरेन रिजिजू यांना सुरक्षितपणे त्यांच्या नियोजीत स्थळी पोहचवण्यात आले आहे. यानंतर येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. गांधी राजकीय अपयशी ठरले आहेत. तसेच, आपली राजकीय कारकीर्द चमकवण्यासाठी ते अदानी मुद्दा उपस्थित करतात असही ते म्हणाले आहेत.

Kiren Rijiju Car Accident
Kiren Rijiju Car Accident

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या गाडीला अपघात

जम्मू : केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या गाडीला जम्मूत कार्यक्रमाला जात असताना अपघात झाला. दरम्यान, यामध्ये कोणीही जखमी नाही अशी माहिती त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्या गाडीला ट्रकने किरकोळ धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कायदामंत्र्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही असेही सांगण्यात आले आहे. त्याबरोबर सोबत असलेले सर्व लोक सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, रिजिजू यांच्या उपस्थितीत डोगरी भाषेत भारतीय संविधानाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसचे राष्टीय नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी राजकीय अपयशी ठरले आहेत. ते आपली राजकीय कारकीर्द चमकवण्यासाठी अदानी मुद्दा 'जाणूनबुजून' उपस्थित करतात असही ते म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

कारकीर्द उजळण्यासाठी हे सर्व केले जात आहे : यावेळी बोलताना रिजिजू यांनी काँग्रेसवर न्यायव्यवस्था कमकुवत केल्याचा आरोप केला आहे. तसेच, जर विरोधी पक्षाने न्यायव्यवस्थेवर हल्ला करून संविधानाचे तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. त्याचवेळी मी यावर (हिंडेनबर्ग-अदानी प्रकरण) भाष्य करणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच एक समिती स्थापन केली आहे आणि ते त्यावर लक्ष ठेऊन आहेत. राहुल गांधी यांची राजकीय कारकीर्द उजळण्यासाठी हे सर्व केले जात आहे. असही ते म्हणाले आहेत.

काँग्रेस हताश : मुद्दाम हा मुद्दा बनवला जात असल्याचे ते म्हणाले, भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणाले, 'देश संविधान आणि कायद्याने चालतो. एखादी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अयशस्वी झाली आहे आणि ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना त्यांचे करिअर चमकवण्याचा मुद्दा बनवत आहेत. न्यायाधीशांना धमकी दिल्याच्या प्रकरणावर रिजिजू म्हणाले, काँग्रेस हताश आहे आणि न्यायव्यवस्थेवर हल्ला करत आहे, पण सरकार गप्प बसणार नाही.

तर आम्ही गप्प बसणार नाही : गांधींना 'मोदी आडनाव' बद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले होते. कायदामंत्र्यांनी आरोप केला, काँग्रेसची (न्यायपालिकेला धमकावण्याची) सवय आहे. 1975 मध्ये आणीबाणी लागू होण्यापूर्वीच त्यांच्या नेत्यांनी न्यायव्यवस्थेवर हल्ला केला होता आणि त्यांच्या निराशेमुळे ते आणखी हल्ले करतील. रिजिजू म्हणाले, 'आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि जर त्यांनी राज्यघटनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही.''

घराणेशाहीचे राजकारण : ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बरोबरच म्हटले आहे की, घराणेशाहीच्या राजकारणाशी संबंधित व्यक्ती धोक्यात आहे, लोकशाही नाही. ब्रिटनमधील गांधींच्या ताज्या वक्तव्यावर टीका करताना शाह यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये म्हटले होते की, जे धोक्यात आहे ते लोकशाही नसून 'तुमचे कुटुंब' आणि घराणेशाहीचे राजकारण आहे.

हेही वाचा : CM Eknath Shinde in Ayodhya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्यानगरीत दाखल; UP सरकारने केले स्वागत

Last Updated :Apr 8, 2023, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.