ETV Bharat / bharat

Kejriwal bungalow renovation case : मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, बंगला नूतनीकरण प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 10:44 PM IST

Kejriwal bungalow renovation case : केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरण प्रकरणात सीबीआयने प्राथमिक तपास सुरू केलाय. यामुळं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Kejriwal bungalow renovation case
Kejriwal bungalow renovation case

नवी दिल्ली Kejriwal bungalow renovation case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकरणाच्या प्रकरणाची दखल घेत सीबीआयनं बुधवारी प्राथमिक तपास सुरू केला. आता सीबीआयचं एक पथक सर्व पुरावे तपासणार आहे. कथित भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य आहे की नाही याची चौकशी सीबीआयच्या पथकानं सुरू केलीय. या घराच्या बांधकामाशी संबंधित सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात येणार असून विविध विभागांच्या फायलींचीही छाननी होणार आहे.

  • सीबीआय चौकशीचे आदेश : सीबीआय अधिकारी अधिकृतपणे काहीही बोलणं टाळत आहेत, मात्र एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, यापूर्वी केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाशी संबंधित आरोपांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. दिल्ली नायब राज्यपालांच्या शिफारशीनंतर हा आदेश देण्यात आला आहे.

'आप'चा भाजपावर हल्ला : सीबीआय तपास सुरू असताना, आम आदमी पक्षानं भाजपावर टीका केलीय. भाजपानं आम आदमी पार्टीचा नाश करण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरली आहे. आता सर्व तपास यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरलं आहे. दिल्लीतील 2 कोटी जनता अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहे. या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. भाजपाला कितीही चौकशी करायची असली, तरी अरविंद केजरीवाल जनतेच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहतील.

नायब राज्यपालांनी घेतली होती दखल : सीएम केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइन्स येथील 6 फ्लॅग स्टाफ रोडवरील सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणाच्या नावाखाली सुमारे 45 कोटी रुपये खर्च झाल्याची तक्रार करण्यात आली होती. भाजपा व्यतिरिक्त, राज्य काँग्रेसच्या नेत्यांनीही उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली होती. यानंतर उपराज्यपालांनी प्रधान सचिवांना संबंधित विभागाकडून यासंदर्भात सविस्तर माहिती मागवली होती. विविध विभागांच्या अहवालात अनियमितता आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. Rahul Gandhi Interaction Porters : देशाचं ओझं वाहणारे आज सक्तीनं ओझ्याखाली दबले, हमालांच्या दुर्व्यवस्थेबद्दल राहुल गांधींची खंत
  2. Narayan Rane Targets Uddhav Thackeray : संजय राऊत मातोश्रीत पगारदार नोकर, उद्धव ठाकरेंना काही कळत नाही; नारायण राणेंचा प्रहार
  3. Rozgar Melava 2023 : पंतप्रधानांनी 51 हजार उमेदवारांना दिलं नियुक्ती पत्र
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.