ETV Bharat / bharat

Karnataka Minister Umesh Katti Passed Away : कर्नाटकचे अन्न पुरवठा मंत्री उमेश कट्टी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

author img

By

Published : Sep 7, 2022, 8:13 AM IST

कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी Karnataka Food Civil Supplies Minister Umesh Katti यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने Karnataka Minister Umesh Katti dies निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कट्टी डॉलर्स कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये कोसळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक Karnataka Revenue Minister R Ashok म्हणाले की, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कट्टींना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांनी प्राणजोत मलावली Umesh Katti passed away होती.

Umesh Katti Passed Away
कर्नाटकचे अन्न पुरवठा मंत्री उमेश कट्टी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बेंगळुरू : कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार मंत्री उमेश कट्टी Karnataka Food Civil Supplies Minister Umesh Katti यांचे मंगळवारी रात्री येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने Karnataka Minister Umesh Katti dies निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. कट्टी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कट्टी डॉलर्स कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये कोसळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक Karnataka Revenue Minister R Ashok म्हणाले की, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कट्टी रुग्णालयात आणले तेव्हा त्यांनी प्राणजोत मलावली Umesh Katti passed away होती. कट्टी यांच्या निधनाने भारतीय जनता पक्ष, बेळगाव जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई Chief Minister Basavaraj Bommai यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई Chief Minister Basavaraj Bommai म्हणाले की, राज्याने एक अनुभवी राजकारणी, एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे. बातमी समजल्यावर जलसंपदा मंत्री गोविंद करजोल, आरोग्य मंत्री के सुधकरसह भाजपच्या अनेक नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. विरोधी पक्षनेते तसेच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट former chief minister Siddaramaiah tweeted करून कट्टी यांना श्रद्धांजली वाहीली आहे."उमेश कट्टी यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. असे ट्विट त्यांनी केले आहे.

आठ वेळा आमदार - अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार मंत्री उमेश कट्टी यांचा जन्म हुक्केरी तालुक्यातील बेलाडबागेवाडी येथे झाला होता. कट्टी बेळगाव जिल्हातील हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून आठ वेळा आमदार होते. 1985 मध्ये त्यांचे वडील विश्वनाथ कट्टी Vishwanath Katti यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, कट्टी जनता पार्टी, जनता दल, JD(U) आणि JD(S) मध्ये होते. त्यांनी यापूर्वी जे एच पटेल, बी एस येडियुरप्पा, डी व्ही सदानंद गौडा आणि जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. उत्तर कर्नाटकला राज्याचा दर्जा देण्याची मागणीच्या विधानांमुळे तसेच मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षा उघडपणे व्यक्त केल्याबद्दल कट्टी अनेकदा चर्चेत होते.

हेही वाचा - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील याचिकेवर आज घटनापीठाकडे सुनावणीची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.