ETV Bharat / bharat

Karnataka Election 2023: पंतप्रधान मोदींचा कर्नाटकात हल्लाबोल! काँग्रेसने आतापर्यंत मला 91 वेळा शिव्या दिल्या

author img

By

Published : Apr 29, 2023, 3:45 PM IST

कर्नाटक विधानसभेचा प्रचार सध्या शिगेला पोहचलेला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बिदर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला जढवला.

Karnataka Election 2023
PM Modi

बीदर (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभेचा जोरात प्रचार सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह इतर प्रादेशीक पक्षही रिंगणात उतरलेल आहेत. रोज प्रचाराचा नवा अंक येथे पाहायला मिळत आहे. त्यातच आता काँग्रेस आणि भाजपमध्ये टीकेची झोड उठली आहे. त्यामध्ये एकमेकांवर जोरदार आरोप सुरू आहेत. काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान विषारी सापासारखे आहेत. त्यावरून आता पंतप्रधानांनी पलटवार केला आहे. काँग्रेसने मला आजपर्यंत 91 वेळा शिव्या दिल्या आहेत असा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील बिदर येथे जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.

  • #WATCH | "Congress has started abusing me again. Every time Congress abuse me, it gets demolished. Congress has abused me 91 times...Let Congress abuse me, I will keep on working for the people of Karnataka...," says PM Narendra Modi addresses a public meeting at Humnabad in… pic.twitter.com/bd4XbN0nT6

    — ANI (@ANI) April 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसला राज्यातील जनतेची चिंता नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथे जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना काँग्रेस गरीबांचा संघर्ष आणि वेदना कधीच समजून घेणार नाही असा घणाघात केला. काँग्रेस फक्त सत्तेचे राजकारण करते. तसेच, ते म्हणाले की, भाजपने येथील महिलांना घरांचे मालकी हक्क दिले आहेत. तर, काँग्रेसने केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले. काँग्रेस सरकारमुळे कर्नाटकातील जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेसला राज्यातील जनतेची चिंता नसून केवळ मतांची चिंता आहे असही ते म्हणाले आहेत.

शासनाच्या नावाखाली तुष्टीकरण : पंतप्रधान पुढे म्हणाले, 'भाजपने करोडो माता-भगिनींची बँक खाती उघडली, थेट सरकारी मदत मिळावी, अशी व्यवस्था भाजपने केली. हमीशिवाय मुद्रा कर्ज मिळावे, अशी व्यवस्था भाजपने केली. मोफत रेशन मिळावे अशी व्यवस्था केली. काँग्रेसने बंजारा समाजासाठी काहीही केले नाही, तर भाजपने या सर्व लोकांना विकासाशी जोडले. भाजपने लोकांच्या भल्यासाठी अनेक गोष्टी केल्या तर काँग्रेसने केवळ समाजात फूट पाडली, शासनाच्या नावाखाली तुष्टीकरणाला प्रोत्साहन दिले असा थेट आरोपही पंतप्रधानांनी केला आहे.

तर अवस्था इतकी दयनीय झाली नसती : जो सामान्य माणसाबद्दल बोलतो, त्यांचा भ्रष्टाचार उघड करतो, त्यांच्या स्वार्थी राजकारणावर हल्ला करतो, त्यांचा काँग्रेसला तिरस्कार आहे. या निवडणुकीतही काँग्रेसने मला पुन्हा शिवीगाळ सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या लोकांनी मला 91 वेळा वेगवेगळ्या प्रकारे शिवीगाळ केली आहे. या शिव्यांच्या शब्दकोशात वेळ वाया घालवण्याऐवजी काँग्रेसने सुशासनासाठी एवढी मेहनत घेतली असती, तर त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली नसती.

हेही वाचा : निकालाचा धुरळा, राष्ट्रवादीच्या हाती सर्वाधिक ४९ तर भाजपकडे २५ बाजार समित्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.