ETV Bharat / bharat

Karnal Police 8 Special Teams : खलिस्तानी दहशतवाद्यांचा काय होता डाव? महाराष्ट्रासह इतर राज्यांत कर्नाल पोलीस करणार तपास

author img

By

Published : May 6, 2022, 10:50 PM IST

Karnal Police 8 Special Teams
खलिस्तान दहशतवाद्यांचा काय होता डाव

हरियाणातील कर्नाल येथे गुरुवारी चार दहशतवाद्यांना अटक केल्याने ( Karnal Terrorist Arrest ) देशभरात खळबळ उडाली आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, करनाल पोलिसांनी बस्तारा ( Khalistani militants near Bastara ) टोलजवळून चार खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली. लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पाकिस्तानमध्ये बसून हरविंदर सिंग रिंडा ( Harvinder Singh Rinda ) याच्या सांगण्यावरून देशातील विविध राज्यात शस्त्रास्त्रे पुरवत होते.

कर्नाल ( हरियाणा ) - कर्नाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नालमधून अटक करण्यात आलेले दहशतवादी देशाच्या विविध भागात शस्त्रास्त्रे पुरवायचे. ही गोष्ट गांभीर्याने घेत कर्नाल पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 8 पथके ( Karnal Police special team on terrorist ) तयार करण्यात आली आहेत. पोलिसांची ही पथके देशाच्या विविध भागात पाठवण्यात आली आहेत. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये छापे टाकून दहशतवाद्यांचा संपूर्ण प्लान उघड करण्यात येणार आहे.

हरियाणातील कर्नाल येथे गुरुवारी चार दहशतवाद्यांना अटक केल्याने ( Karnal Terrorist Arrest ) देशभरात खळबळ उडाली आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, करनाल पोलिसांनी बस्तारा ( Khalistani militants near Bastara ) टोलजवळून चार खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली. लुधियाना येथील भूपिंदर सिंग ( Bhupinder Singh ) आणि फिरोजपूर येथील गुरप्रीत सिंग, परमिंदर सिंग आणि अमनदीप सिंग अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पाकिस्तानमध्ये बसून हरविंदर सिंग रिंडा ( Harvinder Singh Rinda ) याच्या सांगण्यावरून देशातील विविध राज्यात शस्त्रास्त्रे पुरवत होते.

मोबाईल अॅपद्वारे लोकेशन पाठवित असे- हरविंदर सिंग रिंडा हा पाकिस्तानात बसून मोबाईल अॅपद्वारे भारतातील आपल्या गुंडांना लोकेशन पाठवत असे. त्याच ठिकाणी या लोकांना शस्त्रास्त्रे आणि स्फोटके पुरवायची होती. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे ठिकाण तेलंगणातील आदिलाबाद येथील आहे. अटक करण्यात आलेले चार दहशतवादी आदिलाबाद येथे शस्त्रास्त्रे पुरविण्यासाठी जात होते. पाकिस्तानात बसलेला रिंडा ड्रोनच्या मदतीने पंजाबमधील फिरोजपूरच्या शेतात शस्त्रे आणि स्फोटके पाठवत असे.

स्फोटके, हत्यारे व रोख रक्कम जप्त- अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या झडतीदरम्यान इनोव्हा वाहनातून एक मॅगझिन, देशी बनावटीचे पिस्तूल, 31 जिवंत काडतुसे, 3 लोखंडी कंटेनर जप्त केले. यासोबतच एक लाख ३० हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. वाहनातील तरुणांकडून सहा मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.

ड्रोनद्वारे शेतात आणली होती स्फोटके- अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी प्राथमिक चौकशीत सांगितले की, गुरप्रीतच्या लुधियाना तुरुंगात नजरकैदेत असताना त्याची भेट गुरुदासपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या राजवीरशी झाली होती. या कामासाठी पैसे मिळत असल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग रिंडा याने पंजाबमधील रहिवासी असलेल्या आकाशदीपच्या आजीच्या शेतात ड्रोनद्वारे स्फोटक साहित्य पोहोचवले होते. हे स्फोटके तेथून पाठवायचे होते. मात्र तो आपल्या योजनेत यशस्वी होऊ शकला नाही. याआधीही अशाच प्रकारे स्फोटके व शस्त्रे पाठविण्याची योजना आखण्यात आली होती.

हेही वाचा- Haryanas explosives case : संशयित दहशतवाद्यांचे निघाले पाकिस्तान कनेक्शन, 'हा' होता धक्कादायक कट

हेही वाचा- LeT militant Yousuf Kantroo : 22 वर्षे कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यासह दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाची बारामुल्लामध्ये कामगिरी

हेही वाचा- ATS Arrested Peddler : पुण्यात १२ लाखांचे ड्रग्स जप्त; दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.