ETV Bharat / bharat

Kapil Dev Statement : भारतीय संघातील 'या' खेळाडूने कपिल देव यांना केले प्रभावित

author img

By

Published : Mar 14, 2022, 1:01 PM IST

भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव ( Veteran cricketer Kapil Dev ) यांनी सांगितले की, सध्याच्या भारतीय संघात कोणत्या खेळाडूने त्यांना सर्वात जास्त प्रभावित केले आहे. देव यांनी या भारतीय क्रिकेटपटूची खासियतही सांगितली.

Ind
Ind

फरीदाबाद : भारतीय दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव ( Veteran Indian cricketer Kapil Dev ) म्हणाले की, ते रवींद्र जडेजाला सर्वात जास्त पसंद करतात. कारण 33 वर्षीय अष्टपैलू खेळाडू कोणत्याही परिस्थितीत दडपणाखाली येत नाही. 1983 च्या विश्वचषक विजेत्या ( 1983 World Cup winners ) संघाच्या कर्णधाराने सांगितले की, डावखुऱ्या फलंदाजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो क्रिकेटच्या प्रत्येक पैलूचा आनंद घेतो आणि हेच त्याच्या यशाचे कारण असू शकते.

रवींद्र जडेजाचा खेळ आवडतो -

फरीदाबाद येथील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये उत्तर भारतातील पहिल्या पूर्णतः कार्यक्षम जॉइंट रिप्लेसमेंट रोबोटचे उद्घाटन ( Inauguration of the Joint Replacement Robot ) करताना, कपिल देव म्हणाले, "नवीन क्रिकेटपटूंमध्ये मला रवींद्र जडेजाचा खेळ आवडतो ( I like Ravindra Jadeja's game ). कारण तो दबावाशिवाय खेळतो. तो क्रिकेटचा आनंद घेतो. त्यामुळे तो फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चांगला आहे. क्षेत्ररक्षणातही तो उत्तम कामगिरी करतो.

9 मार्च रोजी ताज्या ICC कसोटी क्रमवारीत जडेजा अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ( Top ranked all-rounder ) बनला आहे. जडेजाची सामनावीर कामगिरी, जिथे त्याने त्याच्या कारकिर्दीची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर मोहाली कसोटीत भारताने श्रीलंकेविरुद्ध एक डाव आणि 22 धावांनी विजय मिळवला. यामध्ये त्याच्या नाबाद 175 धावांच्या खेळीचा आणि गोलंदाजीतील 9/87 विकेट्सचा समावेश होता.

कोणते क्रिकेट स्टेडियम त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे, असे विचारले असता, 'हरियाणा तुफान' म्हणाला की, त्याला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम ( MA Chidambaram Stadium in Chennai ) सर्वात जास्त आवडते. कारण तिथे तो कधीच अपयशी ठरला नाही. चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या 11व्या कसोटीत त्याने दोन शानदार शतकांसह 707 धावा केल्या आणि 40 बळी घेतले होते.

चेपॉकवर कधीही अपयशी ठरलो नाही - कपिल देव

131 कसोटी खेळलेल्या कपिल यांनी सांगितले की, मी अभिमानाने सांगू शकतो की चेपॉक अशा मैदानांपैकी एक आहे. जिथे मी कधीही अपयशी ठरलो नाही. ते फरिदाबाद येथील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये 'जॉइंट रिप्लेसमेंट रोबोट'च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.