ETV Bharat / bharat

Shopian Encounter: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक.. एका दहशतवाद्याला धाडले यमसदनी..

author img

By

Published : Nov 11, 2022, 7:59 AM IST

Shopian Encounter: जम्मू काश्मीरच्या शोपीयान भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या घटनेत एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी यमसदनी धाडले JeM terrorist killed in encounter आहे.

JeM terrorist killed in encounter in J-K's Shopian
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक.. एका दहशतवाद्याला धाडले यमसदनी..

श्रीनगर : Shopian Encounter: जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद (JeM) संघटनेच्या विदेशी दहशतवाद्याला ठार करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी JeM terrorist killed in encounter दिली.

कामरान भाई उर्फ हनीस असे या दहशतवाद्याचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी पहाटे शोपियान जिल्ह्यातील कपरेन भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी ट्विट केले आहे की, "JeM # दहशतवादी संघटनेचा एक FT ठार झाला, त्याची ओळख कमरान भाई @Hanees असे आहे जो # कुलगाम-#Shopian भागात सक्रिय होता. शोध अजूनही सुरू आहे," काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी ट्विट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.