ETV Bharat / bharat

JEE Main Topper Interview : जेईई टॉपर ज्ञानेश इंटरनेट आणि सोशल मीडियापासून चार हाथ लांबच, मोटिव्हेशनसाठी वाजवत असे गिटार!

author img

By

Published : Feb 7, 2023, 12:55 PM IST

जेईई मेनच्या जानेवारी सत्र परिक्षेत चंद्रपूरचा ज्ञानेश शिंदे देशात प्रथम आला आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना ज्ञानेशने परिक्षेची तयारी करतानाचे आपले अनुभव आणि आपल्या यशाचे रहस्य सांगितले आहे.

JEE Main Topper Interview
जेईई टॉपर ज्ञानेश शिंदे

कोटा (राजस्थान) : जेईई मेन परिक्षेच्या जानेवारी सत्राचा निकाल आज जाहीर झाला. या परिक्षेत चंद्रपूरचा ज्ञानेश शिंदे 100 पर्सेंटाइल घेऊन देशात प्रथम आला आहे. तो राजस्थाच्या कोटा येथे राहून परिक्षेसाठी कोचिंग घेत होता. ईटीव्ही भारतने ज्ञानेश आणि त्याची आई माधवी यांची खास मुलाखत घेतली आहे. ज्ञानेशने लहानपणापासून अँड्रॉईड फोन वापरला नसून त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे इंटरनेट कनेक्शन नाही आहे. जेव्हा त्याचे अभ्यासातून लक्ष विचलित व्हायचे तेव्हा तो एकाग्रता वाढवण्यासाठी गिटार किंवा कीबोर्डवर संगीत वाजवायचा.

आठवी पासून आयआयटीचे स्वप्न : ज्ञानेश शिंदेने सांगितले की, त्याने आठवीतच आयआयटी बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्स शाखेतून बीटेक करायचे ठरवले होते. याच उद्देशाने तो कोटा येथे आला होता. कोटाचे कौतुक करताना तो म्हणाला की, येथील वातावरण चांगले आहे. याला शिक्षणाचे शहर म्हटले जाते. येथे देशभरातून मोठ्या संख्येने मुले येतात. आयआयटी बॉम्बेमध्ये गेल्यानंतर मला तिथे शिक्षण घ्यायचे आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे ध्येय आहे. मात्र, यासाठी आगामी अ‍ॅडव्हांस परीक्षेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर झाल्यानंतर परदेशात जायला आवडेल का, असे विचारले असता तो म्हणाले, मला मिळणाऱ्या संधींवर ते अवलंबून असेल. आता बाहेर जाण्याचे कोणतेही ध्येय नाही. माल देशात राहूनच सेवा करायची आहे.

कोटाच्या वातावरणाचा फायदा : कोटाच्या कोचिंग इन्स्टिट्यूटने त्याला खूप मदत केल्याचे ज्ञानेश म्हणाला. येथील प्राध्यापकांनी सर्व शंकांचे निरसन केले. अभ्यासाचे साहित्यही असे आहे की मी घरी जाऊन सर्व संकल्पना क्लिअर करू शकतो. माझ्याकडे जो काही गृहपाठ होता, तो मी गांभीर्याने पूर्ण केला. मी मेहनत करत राहिलो, आज त्याचे फळ मला मिळाले आहे. लहानपणापासूनच मला अभ्यासाची आवड होती, असेही तो म्हणाले. माझी आई लहानपणापासूनच माझी शिक्षिका होती आणि तिने मला खूप काही शिकवले आहे. माझा विश्वास आहे की पाया चांगला असला तर संकल्पना स्पष्ट होतात. कोटा येथील स्पर्धा अतिशय खडतर आहे. येथील टॉपर्समध्ये स्पर्धा आहे. एकही नंबर कापला तर तुमची रँक खूप मागे जाते. विद्यार्थ्याने 100 पर्सेंटाइल आणि काम करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.

दबाव न घेता सुधारणेवर काम केले पाहिजे : ज्ञानेश याने अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना टिप्स देताना सांगितले की, त्यांनी वर्गात केलेल्या अभ्यासाची योग्य उजळणी करावी. अभ्यासात जे समाविष्ट आहे ते पूर्ण करा. कोचिंग इन्स्टिट्यूटने आपल्या साहित्याची रचना अशा प्रकारे केली आहे की मुलांच्या सर्व संकल्पना स्पष्ट होतात. त्यांनी प्रश्न तयार करण्याचा सरावही केला पाहिजे. यातून ज्ञान वाढते. कधीकधी असे होते की परीक्षेचा निकाल खराब लागतो. मात्र तुम्ही तुमच्या सुधारणेवर काम केले पाहिजे. यामुळे मानसिकता चांगली राहते आणि तुम्ही चांगली कामगिरी करू शकता.

जो निकाल लागला तो मान्य करा : ज्ञानेशची आई माधवी म्हणाली की, कधीकधी असे घडते की, परीक्षेत मुलाचा निकालाची टक्केवारी कमी राहते. त्यामुळे गुण थोडे कमी होतात. त्यामुळे मूल तणावाखाली येते. मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की, परीक्षा हा तुमचा सराव आहे, अंत नाही. तुम्ही मेहनत करत राहा, बाकी देवाची इच्छा आहे. तुम्ही तुमचे 100 टक्के द्यायला हवे आणि त्यानंतर येणाऱ्या परिणामांवर तुम्ही आनंदी असले पाहिजे. कोटाच्या प्रेमात पडून मुले विचलित होतात. यावर माधवी म्हणाल्या की, लहानपणापासूनच ज्ञानेश हा अतिशय शांत आणि अभ्यासू मुलगा आहे. त्याचे कोणतेही मित्र मंडळ नाही. त्याचे मोजकेच मित्र होते. ती सगळी शिकणारी मुलं होती. खूप अभ्यास करताना विचलित किंवा थकवा जाणवला की तो संगीत ऐकत असे. त्याेनी लहानपणापासून गिटार आणि कीबोर्ड वाजवण्याचा सराव केला. अशा परिस्थितीत गिटार वाजवून त्याला प्रेरणा मिळत असे.

आठवीपासून कोटा येथून शिक्षण : ज्ञानेशचे वडील हेमेंद्र शिंदे हे मध्य प्रदेशच्या सिंगरौली येथे नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्याची आई माधवी गृहिणी आहे. तर मोठी बहीण समृद्धी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तो मूळचा चंद्रपूरचा रहिवासी आहे. ज्ञानेशने शिक्षण चंद्रपूरमधूनच सुरू केले. माधवी सांगतात की, 2018 मध्ये ती मुलगी समृद्धीसोबत कोटा येथे आली होती. त्यावेळी ज्ञानेश आठवीत शिकत होता. तो तेव्हापासून कोटा येथे शिकत आहे. 2019 मध्ये नेट उत्तीर्ण केल्यानंतर समृद्धीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरमध्ये प्रवेश मिळाला, तेव्हापासून ती एमबीबीएस करत आहे.

सोशल मीडियापासून दूर : माधवी यांनी सांगितले की, त्यांनी दोन्ही मुलांना अ‍ॅंड्रॉइड मोबाईल वापरू दिले नाहीत. कोचिंग इन्स्टिट्यूटमधून येणारे स्टडी मटेरियल त्या स्वतःच्या मोबाईलवर मागायच्या. दोन्ही मुलांनी लहानपणापासून कोटामध्ये शिकण्यापर्यंत इंटरनेट आणि अँड्रॉइड फोन वापरला नाही. ज्ञानेश ज्या आयपॅडने अभ्यास करायचा त्या आयपॅडमध्येही कोणत्याही प्रकारचे सिम नव्हते. गरज भासल्यास त्याच्या आईच्या मोबाईलवरून त्याला इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले. लहानपणापासून त्याचे सोशल मीडिया नेटवर्कवर कोणतेही खाते नाही.

हेही वाचा : Apsara Iyer Harvard : 136 वर्षांत प्रथमच भारतीय वंशाच्या व्यक्तीची हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या अध्यक्षपदी निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.