ETV Bharat / bharat

Israel Palestine Conflict : हजारोंचा बळी गेल्यानं संयुक्त राष्ट्रसंघाला चिंता, इस्राईल-हमास युद्ध थांबविण्याचं केलं आवाहन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 9:54 AM IST

Updated : Oct 10, 2023, 11:18 AM IST

Israel Palestine Conflict
संग्रहित छायाचित्र

Israel Palestine Conflict : इस्राईल आणि हमासच्या हल्ल्यात हजारो नागरिकांचा बळी गेल्यानं संयुक्त राष्ट्रसंघानं चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं हे युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे. ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करावी, असंही संयुक्त राष्ट्र संघानं स्पष्ट केलं आहे.

जिनेव्हा Israel Palestine Conflict : इस्राईल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. हमासनं हल्ला केल्यानंतर आतापर्यंत 700 इस्राईली नागरिकांचा मृत्यू झाला असून 2 हजार 300 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. इस्राईलनं हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र या दोन्ही राष्ट्रातील हल्ल्यानंतर हजारो नागरिकांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाल्यानं संयुक्त राष्ट्र संघानं मोठी चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धात बळी गेलेल्या नागरिकांविषयी चिंता व्यक्त करुन हमासनं केलेल्या घातपाती हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

  • Israel-Palestine war: Hamas threatens execution of captives; UN 'distressed' by Gaza 'siege'; Netanyahu vows to 'change Middle East'
    Civilians are paying a high price. Around 800 people have been killed in Israel. Nearly 500 have been killed in Gaza. https://t.co/EOuPTrYK2o

    — ETV Bharat (@ETVBharatEng) October 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले संयुक्त राष्ट्र संघाचे सचिव : हमास आणि इस्राईलमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे संयुक्त राष्ट्र संघानं चिंता व्यक्त केली. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पॅलेस्टाईन नागरिकांच्या तक्रारीची आपणाला कल्पना आहे. मात्र दहशतवादी कारवाया आणि हत्येचं समर्थन करु शकत नाही. या युद्धामुळे लाखो नागरिकांचा बळी गेला आहे. हजारो नागरिक जखमी झाले असून त्यांना अपंगत्व आलं आहे. त्यामुळे हे हल्ले तत्काळ थांबवण्यात यावेत. नागरिकांना ओलीस ठेवलं आहे, त्यांची तत्काळ सुटका करावी, असं संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी स्पष्ट केलं आहे.

  • While I recognize Israel’s legitimate security concerns, I also remind Israel that military operations must be conducted in strict accordance with int'l humanitarian law.

    Civilians must be respected & protected at all times.

    Civilian infrastructure must never be a target.

    — António Guterres (@antonioguterres) October 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संयुक्त राष्ट्र संघानं व्यक्त केली चिंता : इस्रायल आणि गाझा या दोन्ही देशांतील नागरिकांचा युद्धात बळी गेला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघानं हमासनं केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. हमासनं ओलीस ठेवलेल्या नागरिकांची तत्काळ सुटका करण्याचं संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यावेळी स्पष्ट केलं. या युद्धात आणखी बळी जाण्याची शक्यताही सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी वर्तवली आहे. न्यूयॉर्कमध्ये माध्यमांना दिलेल्या निवेदनात सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 1 लाख 37 हजारपेक्षाही अधिक नागरिक बेघर झाली आहेत. या नागरिकांना UNRWA च्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या निर्वासित छावण्यांमध्ये आश्रय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तर संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी हिंसाचार हा वाद सोडवण्याचा मार्ग नाही, हे शत्रुत्व थाबवण्यात यावं. चर्चेतूनच हा वाद सोडवता येईल, असं त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.

  • The @UN must be allowed access to deliver urgent humanitarian assistance to Palestinian civilians trapped & helpless in the Gaza Strip.

    I appeal to the international community to mobilize immediate humanitarian support for this effort. pic.twitter.com/Y3VmubuhtV

    — António Guterres (@antonioguterres) October 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इस्त्रायल गाझा पट्टीला घालणार वेढा : हमासनं हल्ला केल्यानंतर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईनवर हल्ला चढवला आहे. इस्राईल गाझा पट्टीला वेढा घालणार आहे, या घोषणेनं मी खूप व्यथीत झालो आहे, अगोदरच गाझामधील परिस्थिती खूप भयावह होती, आता ती वेगानं खराब होईल, असंही संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हमासनं सुरुवात केली आम्ही शेवट करू : हमास आणि इस्राईल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे नागरिकांचा बळी जात असल्यानं जागतिक पातळीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र हमासला जशास तसं उत्तर देण्याचा चंग इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला आहे. 'हमासनं सुरुवात केली आहे. मात्र त्याचा शेवट आम्ही करू', असा इशाराही पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघानं मोठी चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

  1. Actress Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरूप पोहचली मायदेशी; इस्रायलमध्ये अडकली होती
  2. Israel Hamas Conflict : हमासचा अचानक हल्ला इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश, कसा झाला ५० वर्षांतील सर्वात मोठा हल्ला?
Last Updated :Oct 10, 2023, 11:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.