ETV Bharat / bharat

तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांची केली सुटका; नागरिक विमानतळाच्या दिशेने रवाना

author img

By

Published : Aug 21, 2021, 5:50 PM IST

तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांची केली सुटका
तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांची केली सुटका

तालिबानी दहशतवाद्यांनी काही भारतीयांना व्हेरिफिकेशन आणि प्रवासाच्या कागदपत्राबाबत विचारणा केली होती. त्यांना अज्ञात ठिकाणी नेले होते. त्यामुळे भारतामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती.

नवी दिल्ली - तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे सोडले आहे. तालिबानींनी भारतीय नागरिकांच्या गटाला थांबवून काबुल विमानतळानजीक अज्ञात ठिकाणी शनिवारी नेले होते.

तालिबानी दहशतवाद्यांनी काही भारतीयांना व्हेरिफिकेशन आणि प्रवासाच्या कागदपत्राबाबत विचारणा केली होती. त्यांना अज्ञात ठिकाणी नेले होते. त्यामुळे भारतामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. भारतीयांना कोणताही हानी नसल्याचे सुत्राने सांगितले. अफगाणिस्तानमधील माध्यमाच्या माहितीनुसार 150 भारतीय हे काबुल विमानतळाच्या दिशेने जात होते. त्यांना तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीयांचे अपहरण केल्याचे एका पोर्टलने म्हटले होते. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांनी हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर भारतीयांची सुटका करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले होते. हे नागरिक काबुल विमानतळाच्या दिशेने जात असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधील स्थिती आणखी वाईट होत असताना भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. भारतीय हवाई दलाच्या विमानाने सुमारे 80 भारतीयांना शनिवारी काबुलमधून नेले आहे. हे विमान ताजिकिस्तानच्या दुशान्बे येथील विमानतळावर उतरविण्यात आले आहे. नवी दिल्लीजवळील हिनदोन या धावपट्टीवर हे विमान सायंकाळी पोहोचणार आहे.

हेही वाचा-अदानी ग्रुपला झटका, 4500 कोटींच्या आयपीओला सेबीकडून तात्पुरती स्थगित


सी-17 विमानाने केल्या दोन फेऱ्या

यापूर्वी भारताने अफगाणिस्तानमधील भारतीय राजदुतासह 200 भारतीयांना सी-17 या हवाईदलाच्या विमानाने भारतात आणळे आहे. तर सोमवारी अफगाणिस्तानमधून 40 भारतीयांना विमानाने भारतात आणले आहे. सी-17 विमानाच्या दुसऱ्या फेरीत 150 भारतीयांना मंगळवारी भारतात आणले. त्यामध्ये भारतीय राजदूत, अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि दुतावासामधील काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचा-जाणून घ्या, झायडस कॅडिलाच्या लशीबाबत सविस्तर माहिती

काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष केंद्रित
तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांश सर्व मोठी गावे आणि शहरांसह काबुल ताब्यात घेतले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्यदल मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तालिबानींनी अफगाणिस्तानवर सत्ता मिळविली आहे. अमेरिकेच्या मदतीने भारताने अफगाणिस्तानमधून 200 भारतीयांना मायदेशी परत आणण्याची मोहिम पूर्ण केली आहे. काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानातून 80 भारतीयांची सुटका; हवाई दलाच्या विमानाने सायंकाळी मायदेशात परतणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.