ETV Bharat / bharat

भारतीय अर्थव्यवस्थेने 4,000 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडल्याचा दावा, देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 10:33 PM IST

Indian Economy Success : भारताने US$4 ट्रिलियनचा टप्पा ओलांडल्याची माहिती समोर येत आहे. अब्जाधीश गौतम अदानी, दोन केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल कौतुक व्यक्त केलंय. तरीही देशाने हा टप्पा गाठला आहे की नाही याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Indian Economy Success
भारतीय अर्थव्यवस्था

नवी दिल्ली Indian Economy Success : दोन केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय, अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी भारतीय अर्थव्यवस्थेने $4 ट्रिलियनचा टप्पा ओलांडल्याची प्रशंसा केली. परंतु अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही. हा टप्पा गाठण्याबाबत सरकारकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. (Indian Economy's $4 Billion Phase)

  • This is what dynamic, visionary leadership looks like !
    That’s what our #NewIndia progressing beautifully looks like !
    Congratulations to my fellow Indians as our Nation crosses the $ 4 trillion GDP milestone!
    More power to you, more respect to you Hon PM @narendramodi ji !… pic.twitter.com/wMgv3xTJXa

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बातमीविषयी साशंकता: अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचा जीडीपी $ 4 ट्रिलियन ओलांडल्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल पोस्टवर टिप्पणी केलेली नाही. दरम्यान, उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले की, सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेली ही बातमी चुकीची आहे आणि भारत अजूनही 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून दूर आहे.

कौतुक करणाऱ्यांमध्ये यांचा समावेश: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) डेटावर आधारित सर्व देशांच्या नवीनतम GDP आकड्यांचा असत्यापित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ते शेअर करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेकांचा समावेश आहे. फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या यशाचं कौतुक केलं. यासंदर्भात ट्विट करणाऱ्यांमध्ये जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी आणि तेलंगणा भाजपा अध्यक्ष डी पुरंदेश्वरी यांचा समावेश आहे.

उद्योगपती अदानी यांच्याकडून प्रशंसा : देशातील आघाडीचे उद्योगपती अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, 'अभिनंदन, भारत. भारताला GDP च्या बाबतीत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी फक्त दोन वर्षे उरली आहेत. जपानला $4,400 अब्ज आणि जर्मनी $4,300 अब्ज. तिरंगा फडकतच राहिला! जय हिंद.' सर्व देशांसाठी जीडीपी डेटाचे नवीनतम निरीक्षण करणे खूप कठीण आहे; कारण अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांसाठी डेटा थोड्या अंतराने उपलब्ध आहे.

हेही वाचा:

  1. एसबीआयमध्ये 8283 ज्युनियर असोसिएट्स पदासाठी मेगा भरती; 'ही' आहे शेवटची तारीख
  2. Cyber Fraud : सणासुदीच्या काळात सायबर फ्रॉडला बळी पडू नये यासाठी 'ही' घ्या काळजी
  3. Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुवर्णनगरी जळगाव ग्राहकांनी गजबजली; सोनं खरेदीसाठी चढाओढ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.