ETV Bharat / bharat

Plane Crash In Bharatpur : राजस्थानच्या भरतपूरमध्ये मिग विमान कोसळले, अपघाताच्या कारणाचा शोध सुरु

author img

By

Published : Jan 28, 2023, 11:43 AM IST

Updated : Jan 28, 2023, 1:02 PM IST

भारतीय हवाई दलाचे मिग विमान शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात कोसळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि हवाई दलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या हवाई दल अपघाताच्या कारणाचा शोध घेत आहे.

Plane Crash In Bharatpur
भरतपूरमध्ये मिग विमान कोसळले

भरतपूरमध्ये मिग विमान कोसळले

भरतपूर (राजस्थान) : भारतीय हवाई दलाचे मिग विमान शनिवारी सकाळी भरतपूर जिल्ह्यातील उचैन भागात कोसळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे.

Plane Crash In Bharatpur
भरतपूरमध्ये मिग विमान कोसळले

सकाळी 10.30 वाजता अपघात : हवाई दलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा एअरफोर्स स्टेशनवरून या विमानाने उड्डाण घेतल्याची शक्यता आहे. सध्या हवाई दल अपघाताचे कारण शोधत आहे. संरक्षण पीआरओ कर्नल अमिताभ शर्मा यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळाली आहे. कोणत्या विमानाला अपघात झाला आहे, याचा शोध घेतला जात आहे. नगला बिजा येथील ग्रामस्थांनी सांगितले की, शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास अचानक आकाशातून उडणारे एक लढाऊ विमान लोकवस्तीच्या बाहेरील शेतात पडले. अपघाताच्या आवाजाने संपूर्ण गावात खळबळ उडाली. त्यानंतर गावातील शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले. विमानाचे तुकडे गावाबाहेर सर्वत्र विखुरले होते.

Plane Crash In Bharatpur
भरतपूरमध्ये मिग विमान कोसळले

अपघाताच्या ढिगाऱ्यात वैमानिक नाही : विमान अपघाताच्या ढिगाऱ्यात पायलट किंवा इतर जखमी कुठेही दिसत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत वैमानिक अपघातापूर्वीच विमानातून सुखरूप बाहेर पडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत संरक्षण विभाग किंवा हवाई दलाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

Plane Crash In Bharatpur
भरतपूरमध्ये मिग विमान कोसळले

हेही वाचा : MP Fighter Jet Crashed: मध्यप्रदेशात मोठा अपघात.. वायुसेनेचे फायटर जेट विमान जंगलात पडले

Last Updated : Jan 28, 2023, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.