India records first death due to monkeypox: मंकीपॉक्समुळे भारतात पहिला मृत्यू

author img

By

Published : Aug 1, 2022, 3:07 PM IST

Updated : Aug 1, 2022, 3:15 PM IST

मंकीपॉक्समुळे भारतात पहिला मृत्यू
मंकीपॉक्समुळे भारतात पहिला मृत्यू ()

देशातील मंकीपॉक्सने झालेला पहिला मृत्यू नोंदवला आहे. चावक्कड येथील कुरीनियूर येथील 22 वर्षीय तरुणाचा मंकीपॉक्सने मृत्यू झाला. याची पुष्टी पुणे व्हायरोलॉजी लॅबच्या रिपोर्टवरुन झाली आहे.

त्रिशूर: केरळमधील त्रिशूरमध्ये देशातील मंकीपॉक्सने झालेला पहिला मृत्यू नोंदवला आहे. चावक्कड येथील कुरीनियूर येथील 22 वर्षीय तरुणाचा मंकीपॉक्सने मृत्यू झाला. याची पुष्टी पुणे व्हायरोलॉजी लॅबच्या रिपोर्टवरुन झाली आहे.

ही व्यक्ती 21 जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातीतून केरळमध्ये आली. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, ती व्यक्ती मध्य पूर्वेत असताना झुनोटिक रोगासाठी पॉझिटीव्ह चाचणी केली होती. आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, यूएईमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेल्या तरुणाने ही बाब लपवून केरळमध्ये आला होता. आरोग्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मंकीपॉक्स म्हणजे काय? - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य झुनोसिस (प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रसारित होणारा विषाणू) आहे ज्याची लक्षणे भूतकाळात स्मॉलपॉक्स असलेल्या रुग्णांमध्ये दिसल्यासारखीच आहेत, तरी ती वैद्यकीयदृष्ट्या कमी गंभीर आहे. 1980 मध्ये चेचकांचे निर्मूलन आणि त्यानंतर चेचक लसीकरण बंद झाल्यानंतर, मंकीपॉक्स हा सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा ऑर्थोपॉक्स विषाणू म्हणून उदयास आला आहे.

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत - मंकीपॉक्सची काही सामान्य लक्षणे म्हणजे स्नायू दुखणे, डोकेदुखी, ताप, कमी ऊर्जा आणि लिम्फ नोड्स सुजणे. एम्सच्या मेडिसिन विभागातील डॉ. पीयूष रंजन यांच्या म्हणण्यानुसार, "मंकीपॉक्सची लक्षणे कांजण्यांसारखी असतात. सुरुवातीला रुग्णांना ताप आणि लिम्फ नोड्स वाढतात. 1-5 दिवसांनंतर रुग्णाच्या चेहऱ्यावर पुरळ उठू शकते. तसेच तळहातावर आणि पायाच्या तळव्यावर देखील येऊ शकतात. त्यांच्या कॉर्नियावर पुरळ असू शकते ज्यामुळे अंधत्व येऊ शकते." फोड निर्माण करणाऱ्या पुरळांची संख्या एक ते अनेक हजारांपर्यंत असू शकते.

धोका कोणाला आहे - जे लोक मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आहेत, लैंगिक संपर्कासह त्यांना सर्वाधिक धोका आहे. रोगाची लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्याने देखील संसर्ग होऊ शकतो.

मुलांनाही धोका आहे का - डॉ. रंजन उघड करतात "मंकीपॉक्सची संसर्गक्षमता कमी असते परंतु ती मुलांमध्ये घातक ठरू शकते. कोविड-19 संसर्गाची संक्रमणक्षमता अधिक असते, परंतु संक्रमित व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यानंतर मंकीपॉक्सचा संसर्ग होतो. त्यामुळे कोविडमध्ये संसर्गाचे प्रमाण खूप जास्त असते आणि संक्रमित व्यक्ती अनेकांना संक्रमित करू शकते. परंतु, मंकीपॉक्स कमी संसर्गजन्य आहे."

मंकीपॉक्स कसा पसरतो - मंकीपॉक्सचा प्रसार मानवी संपर्कातून आणि प्राणी ते व्यक्ती यांच्या संपर्कातूनही होऊ शकतो. माणसांच्या बाबतीत, चेहऱ्याचा-ते-त्वचा, त्वचेपासून-त्वचा, तोंड-तोंड किंवा तोंड-ते-त्वचा-दुस-या संक्रमित व्यक्तीशी संपर्क झाल्यास मंकीपॉक्स होऊ शकतो. जर आपण प्राण्यांच्या यजमानांबद्दल बोललो तर त्यामध्ये उंदीर आणि प्राइमेट समाविष्ट आहेत. याशिवाय डॉ. रंजन सांगतात की, "या विषाणूची लागण झालेल्या मृत प्राण्याच्या संपर्कात येऊन हा विषाणू माणसांमध्येही पसरतो."

Last Updated :Aug 1, 2022, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.