ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीत 'इंडिया आघाडी' 400 जागांवर भाजपाला टक्कर देण्याच्या तयारीत, वाचा खास रिपोर्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 12:28 PM IST

India Alliance : लोकसभा निवडणुकीतील जागावाटपांच्या चर्चेला 'इंडिया' आघाडीतील पक्षांमध्ये वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 400 जागांवर थेट टक्कर देण्याची युतीची तयारी सुरू आहे. वाचा याबाबतचा ईटीव्ही भारतचे वरिष्ठ प्रतिनिधी गौतम देबरॉय यांचा खास आढावा.

India Alliance
इंडिया आघाडी

नवी दिल्ली India Alliance : जागावाटपाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले असले तरी, आगामी निवडणुकीत किमान ४०० जागांवर भाजपाशी थेट लढत देण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतलाय. माजी खासदार आणि सीपीआय(एम) केंद्रीय समितीचे सदस्य हन्नान मोल्ला यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी गौतम देबरॉय यांनी बातचीत केली. त्यामध्ये ते म्हणाले, 'येत्या निवडणुकीत आम्ही किमान 400 जागांवर भाजपाविरुद्ध एकत्र लढू.' सीपीएम हा इंडिया आघाडीमधील सहयोगी भागीदारांपैकी एक आहे. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून काढून टाकण्याची शपथ घेतलीय असंही ते म्हणालेत.

'इंडिया आघाडी' : हन्नान मोल्ला म्हणाले, 'इंडिया आघाडीचा मुख्य हेतू आहे भाजपाचा पराभव करणे. त्यासाठी जागावाटपावर एकमत व्हावे लागेल आणि मला विश्वास आहे, की विरोधी आघाडीतील सर्व भागीदार सर्व आघाड्यांवर एकमेकांना योग्य महत्त्व देतील. मग ते जागावाटप असो वा संयुक्त निवडणूक प्रचार. गेल्या महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या आपल्या शेवटच्या बैठकीदरम्यान, इंडिया आघाडीने जागा वाटपाचा प्रश्न त्वरीत सोडवण्याबरोबरच एक संयुक्त मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, जागावाटपाचा मुद्दा घेऊन पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनाही संघर्ष निर्माण केलाय.

जागा वाटपाचा मुद्दा योग्य पद्धतीने सोडवला जाईल : अंतर्गत बैठकीत काँग्रेसला दोन जागा देण्याचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेसने ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील टीएमसीवर जोरदार टीका केली आहे. इंडिया आघाडीच्या एका घटकाने प्रथम बहरामपूर आणि मालदा दक्षिण काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काँग्रेसने टीएमसीच्या या प्रस्तावाला विरोध केल्याने टीएमसीकडून काँग्रेसला आणखी एक वेगळा प्रस्ताव दिलाय. त्यामध्ये, गेल्या लोकसभा निवडणुकीतील, विधानसभा निवडणुकीतील मतांचा वाटा किंवा दोन्ही विचारात घेऊन एखाद्या जागेवर सर्वात मोठा पक्ष निश्चित केला जाऊ शकतो. तसेच, हा निर्णय त्या राज्यातील मोठ्या पक्षावर सोडला जावा असाही प्रस्ताव आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, जागा वाटपाचा मुद्दा योग्य पद्धतीने सोडवला जाईल.

काँग्रेसने पुढाकार घ्यावा : इंडिया आघाडीच्या शेवटच्या बैठकीत, सर्व पक्षांनी एकमताने निर्णय घेतला आहे, की जर एखाद्या पक्षाच्या राज्य युनिटला जागावाटपाचा फॉर्म्युला सोडवता आला नाही, तर पक्षाचे केंद्रीय नेतृत्व योग्य सल्लामसलत केल्यानंतर अंतिम निर्णय घेईल. JD(U) चे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले, 'विरोधकांच्या व्यासपीठावर मोठा पक्ष असल्याने काँग्रेसने लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. तसंच, काँग्रेसने इतर सर्व पक्षांना महत्त्व देऊन विरोधी रणनीती बनवावी असंही ते म्हणालेत.

काही मतभेद असू शकतात : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले मतभेद हे युतीच्या विरोधात गेल्याचं राष्ट्रीय राजधानीत झालेल्या शेवटच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत मान्य करण्यात आलं होतं. सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा म्हणाले, इंडिया आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावर काही मतभेद असू शकतात. मात्र, चर्चा करून मार्ग काढू.

AIUDF चा समावेश नाही : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे आसाम प्रभारी जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतर आसाम प्रदेश काँग्रेस कमिटी नेतृत्वाने सांगितलं की, आसाममधील सर्व विरोधी पक्ष राज्यात भाजपाविरोधात एकत्र लढतील. राज्यात भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी आसाममधील जवळपास 16 पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF)चा विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर समावेश नाही असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

1 हॉलिवूड स्टार ख्रिश्चन क्लेपसरचा दोन मुलींसह विमान अपघातात मृत्यू

2 भारतीय नौदलाची कमाल; अपहरण झालेल्या जहाजातून १५ भारतीयांसह सर्व 'क्रू'ची सुटका, 'असं' केलं ऑपरेशन

3 आगामी निवडणुकीत मदतीसाठी रश्मी शुक्लांची महासंचालक पदावर निवड; विद्या चव्हाणांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.