ETV Bharat / bharat

Ind vs Eng T20 series : रोहित शर्माच्या नेतृत्वाखील सलग 13वा विजय; पहिल्या सामन्यात भारताची इंग्लंडवर 50 धावांनी मात

author img

By

Published : Jul 8, 2022, 12:53 PM IST

ind
भारत

भारत आणि इंग्लंड संघात टी-20 मालिकेतील पहिला सामना पार ( Ind vs Eng 1st T20 ) पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर 50 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अष्टपैलू प्रदर्शनासाठी हार्दिक पांड्याला सामनावीर ( Man of the match to Hardik Pandya ) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

साउथम्पटन: सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली ( Ind vs Eng T20 series ) जात आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना गुरुवारी साउथम्पटन येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 50 धावांनी इंग्लंड संघाचा धुव्वा उडवला. त्यामुळे भारतीय संघाकडे या तीन टी-20 सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 198 धावा केल्या होत्या. ज्यामुळे इंग्लंड संघाला विजयासाठी 199 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेला इंग्लंडचा संघ 19.3 षटकांत 148 धावांवर गुंडाळला. त्यामुळे भारतीय संघाने 50 धावांनी विजय ( India won by 50 runs ) तर नोंदवलाच, पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग 13वा विजय नोंदवला ( Rohit Sharma 13 Consecutive T20 Win ) .

भारतीय फलंदाजांची शानदार कामगिरी -

तत्पुर्वी रोहित शर्माने नाणेफेक जिंकत ( Rohit Sharma won the toss ) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. रोहित शर्माने 14 चेंडूत 24 धावा करत बाद झाला. त्यानंतर दीपक हुड्डा 33 (17), सूर्यकुमार यादव 39 (19) आणि हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळी करताना 33 चेंडूत 51 धावा केल्या. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना मोईन अली आणि क्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आर टोप्ले, टायमल मिल्स आणि मॅथ्यू पार्किसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

जोस बटलर चेंडूवर गोल्डन डक -

भारतीय संघाच्या 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. संघाचा कर्णधार जोस बटलर पहिल्या चेंडूवर गोल्डन डक (बाद) झाला ( Jose Butler Golden Duck ). त्यानंतर ही संघाचे फलंदाजी सातत्याने बाद होत राहिले. इंग्लंडच्या सहा फलंदाजाला दुहेरी आकडा देखीळ गाठता आला नाही. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा मोईन अलीने केल्या. त्याने 20 चेंडूचा सामना करताना 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. तसेच क्रिस जॉर्डन 17 चेंडूत 26 धावा काढून नाबाद राहिला. भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिका पांड्याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

हार्दिकची वादळी खेळी -

या सामन्यात हार्दिक पांड्याने चमकदार कामगिरी ( Hardik Pandya stormy game ) केली. त्याने मधल्या फळीत संघाचा मोर्चा सांभाळताना 33 चेंडूत 51 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 6 चौकारांची आतिषबाजी पाहिला मिळाली. तसेच गोलंदाजी करताना देखील त्याने कमाल केली. 4 षटकांत 33 धावा देताना 4 गडी बाद केले. ज्यामध्ये जेसन रॉय, डेव्हिड मलान, सॅम करण आणि लियांम लिव्हिंगस्टोन यांचा समावेश होता. हार्दिकला त्याच्या या अष्टपैलू प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात ( Man of the match to Hardik Pandya ) आले.

हेही वाचा - BIRTHDAY OF MAHENDRA SINGH DHONI: महेंद्र सिंह धोनीचा ४१ वा वाढदिवस, चाहत्यांच्या कटआऊट लावून शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.