ETV Bharat / bharat

New Corona cases In India : भारतात गेल्या 24 तासांत 3,17,532 नवीन कोरोना रुग्ण आढळले

author img

By

Published : Jan 20, 2022, 10:04 AM IST

Updated : Jan 20, 2022, 10:51 AM IST

मुंबई - भारतात गेल्या 24 तासांत 3,17,532 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर यामध्ये 491 मृत्यू झाले असून (Today New corona cases in India) 2,23,990 रुग्ण बरे झाले आहेत. (India Corona Reports ) दरम्यान, कोरोना बाधितांची संख्या 19,24,051 इतकी असून त्यामध्ये रोज कोरोना बाधितांचा दर 16.41% इतका आहे. (New Corona cases In India)तसेच, आतापर्यंत एकूण 9,287 ओमायक्रॉनते प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामध्ये काल पासून 3.63% ची वाढ झाली आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 3,17,532 नवीन कोरोना रुग्ण आढळले

आतापर्यंत 3 कोटी 58 लाख 7 हजार 29 लोक संसर्गमुक्त

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 19 लाख 24 हजार 51 झाली आहे. त्याचबरोबर या कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 87 हजार 693 झाली आहे. आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात दोन लाख 23 हजार 990 रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत 3 कोटी 58 लाख 7 हजार 29 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

आतापर्यंत 159 कोटी 67 लाख 55 हजार 789 डोस लसीचे डोस देण्यात आले

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत, आतापर्यंत कोरोना लसींचे 159 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. बुधवारी दिवसभरात 71 लाख 38 हजार 592 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 159 कोटी 67 लाख 55 हजार 789 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.

बुधवारपर्यंत एकूण 70 कोटी 93 लाख 56 हजार 830 नमुने तपासण्यात आले

देशात आतापर्यंत 9 हजार 287 लोकांना ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे. यापैकी सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) माहिती दिली आहे की, बुधवारी भारतात कोरोना विषाणूसाठी 19 लाख 35 हजार 180 नमुने चाचण्या करण्यात आल्या होत्या. बुधवारपर्यंत एकूण 70 कोटी 93 लाख 56 हजार 830 नमुने तपासण्यात आले आहेत.

हेही वाचा - दुसऱ्याची काम स्वतःच्या नावावर खपवणे हा 'पराक्रम' नाही;सामनातून मोदी सरकारचा समाचार

Last Updated :Jan 20, 2022, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.