ETV Bharat / bharat

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पोलिसांची मोठी कारवाई, कारमधून 3.20 कोटी रुपये जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 10:33 AM IST

Huge Amount of Money Seized : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी निवडणूक आयोगानं तपासणी वाढवलीय. ज्या मतदारसंघात जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे, त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जातंय.

कोट्यावधींची रोकड जप्त
कोट्यावधींची रोकड जप्त

हैदराबाद Huge Amount of Money Seized : हैदराबादच्या हयातनगर आणि नाचाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री पोलिसांनी तब्बल 3.20 कोटी रुपयांची रोकड जप्त केलीय. ऐन निवडणूकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे.

कारमध्ये 2 कोटी रुपयांची रक्कम जप्त : रंगारेड्डी जिल्ह्यातील पेड्डा अंबरपेट येथील सदाशिवा एन्क्लेव्हमधून मोठ्या प्रमाणात पैसे नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआय व्यंकटेश्वरलू यांच्या नेतृत्वाखाली ओआरआर जवळ एक संशयित कार तपासण्यात आली. तपासाणी दरम्यान त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांची रोकड सापडली. यासंदर्भात एलबी नगरचे अतिरिक्त डीसीपी कोटेश्वर राव यांनी सांगितलं की, याप्रकरणी संपती शिवकुमार रेड्डी, सुरकांती महेंद्र रेड्डी, तातीकोंडा महेंद्र रेड्डी, निम्मानी नवीनकुमार रेड्डी आणि हयातनगर येथील सुरवी रमेश यांना ताब्यात घेण्यात आलंय. हे पैसे चौतुप्पलकडे नेण्यात येत असल्याचं चौकशी दरम्यान समोर आलंय.

दुसऱ्य कारमधून 1.20 कोटी जप्त : एलबी नगर आणि कोठापेठ येथील बंदि सुधीर रेड्डी जुन्या गाड्या विकतात. बुधवारी कारनं भुवनगिरीकडे जात असताना पोलिसांनी त्यांना नाचाराम इथं अडवलं. पुढच्या दरवाज्याप्रमाणे मागच्या दारानं सहज प्रवेश करता येत नसल्यानं पोलिसांना संशय आला यामुळं त्यांनी कारची तपासणी केली असता त्यात 1.20 कोटी रुपये रोख दिसले. हे पैसे हबसीगुडा येथील लक्ष्मरेड्डी इथं नेले जात असल्याचं मलकाजीगिरीचे अतिरिक्त डीसीपी वेंकटरामन आणि सीआय प्रभाकर रेड्डी यांनी सांगितलंय.

सोमवारीही 1.44 कोटी केले होते जप्त : आचारसंहिता लागू झाल्यानंतर बँक अधिकारी मोठ्या संस्था आणि व्यक्तींच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याची माहिती निवडणूक आयोगाला देत आहेत. अलीकडेच बशीरबाग आयडीबीआय बँकेतील दोन कंपन्यांच्या खात्यात आठ कोटी रुपये जमा झाल्याचा प्रकार चर्चेचा विषय बनला होता. तो एका प्रमुख पक्षाचा उमेदवार असल्यानं पोलीस त्याचा तपास करत आहेत. वनस्थलीपुरम पोलिसांनी सोमवारी रात्री एका कारमधून मोठी रक्कम जप्त केली. कीर्ती (60) हे सिकंदराबादहून वनस्थलीपुरमच्या दिशेने कारमध्ये बसून रोकड घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. कागदपत्रांअभावी पोलिसांनी कारमधून 1.44 कोटी रुपयांची रोकड जप्त केली.

हेही वाचा :

  1. Pune Crime News : खेळ पैशांचा! चिंचवड मतदारसंघात 43 लाख तर कसबामध्ये 5 लाखांची रोकड जप्त; 'हे' पैसे मतदारांना वाटपासाठी?
  2. Online Betting on World Cup 2023 : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा बुकी विरोधी पथकाच्या ताब्यात; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
  3. 42 Crore Cash Recovered : कर्नाटकात राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरी सापडली '25 खोके' रोकड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.