ETV Bharat / bharat

30 December Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज व्यवसायात सावध राहावे लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

author img

By

Published : Dec 30, 2021, 12:03 AM IST

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

मेष - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावे लागेल. शत्रूंचा उपद्रव वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ विद्येत आवड निर्माण होईल.

वृषभ - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपार नंतर चांगले मनोरंजन होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल. वस्त्र व गृहपयोगी वस्तू ह्यांच्या खरेदीवर खर्च होईल. सामाजिक मान- सम्मान होतील.

मिथुन - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. दुपार नंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. व्यवसायात सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आर्थिक लाभ होतील. कामात यशस्वी व्हाल.

कर्क - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात विचारांचे वादळ उठेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होऊन शारीरिक प्रसन्नता जाणवेल. नव्या कामात अडथळे येतील.

सिंह - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार आज टाळणे हितावह राहील. आईच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

कन्या - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र अनुकूल वातावरण निर्माण होईल. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. नशिबाची साथ लाभेल.

तूळ - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत. आपला अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेणे हितावह राहील.

वृश्चिक - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करू शकाल. आपला आत्मविश्वास वाढीस लागेल.

धनू - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस त्रास संभवतो. विचार पूर्वक कामे न केल्यास आपण अडचणीत येऊ शकाल. व्यावसायिक क्षेत्रात वावरताना आपले वक्तव्य संयमित ठेवावे.

मकर - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. मित्रांपासून सुद्धा लाभ संभवतो.

कुंभ - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. माते कडून एखादा लाभ संभवतो. उत्तम सौख्य लाभेल. शासकीय कामात यश प्राप्ती होईल.

मीन - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणार्‍या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल. व्यापार -व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. शक्यतो आज वाद टाळावेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.