21 सप्टेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

author img

By

Published : Sep 21, 2021, 12:02 AM IST

21 सप्टेंबर राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

मेष - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण - घेवाण करू नका. शारीरिक व मानसिक बेचैनी राहील.

वृषभ - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल.

मिथुन - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. नोकरी-व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

कर्क - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. मंगल कार्य किंवा प्रवास ह्यावर खर्च होईल.

सिंह - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. अवैध कामामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे.

कन्या - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज दांपत्य जीवनात सुखद क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इत्यादींची खरेदी होईल.

तूळ - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामान्यतः प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता मिळाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायक बातमी मिळेल व सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल.

वृश्चिक - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील.

धनू - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल.

मकर - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे. वाणी संयमित ठेवावी लागेल.

कुंभ - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र व नातेवाईक भेटतील. छोटया प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल.

मीन - आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. प्रवासाची शक्यता आहे. तन - मनाने प्रसन्न राहाल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.