ETV Bharat / bharat

20 February Rashi Bhavishya : आज 'या' राशीवाल्यांच्या वैचारिक समृद्धीत वाढ होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

author img

By

Published : Feb 20, 2022, 12:01 AM IST

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

Horoscope 20 February Maharashtra
Horoscope 20 February Maharashtra

मेष - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक दृष्टया उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल व मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानाने फळ मात्र कमी मिळेल. तरीही निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

मिथुन - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आई व स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे व्हाल. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. प्रवाही पदार्थां पासून सावध राहावे लागेल. मानसिक ताण राहील.

कर्क - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र - स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान - सन्मान वाढतील.

सिंह - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्या बरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. अतिरिक्त खर्च संभवतात. निर्धारित कामात अपेक्षे प्रमाणे यश मिळणार नाही. एकंदरीत आजचा दिवस मध्यम आहे.

कन्या - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना मात्र आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे.

तूळ - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. एखादा अपघात संभवतो. कोर्ट - कचेरीच्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. एखादी मानहानी संभवते. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

वृश्चिक - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावेत. आपल्या वक्तव्याने एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट व मानसिक चिंता ह्यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात.

धनू - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे करू शकाल.

मकर - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संतती विषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. पैश्यांचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष द्या. छोटासा प्रवास आनंददायी ठरेल. सरकारी आपत्ती येऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.

कुंभ - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वास्थ्य राहील.

मीन - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या - फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. शारीरिक व मानसिक दृष्टया आज दिवसभर प्रफुल्लित राहाल. आपली प्रतिष्ठा वाढेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.