ETV Bharat / bharat

14 नोव्हेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांचे आज कौटुंबिक वातावरण आनंदी राहील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

author img

By

Published : Nov 14, 2021, 12:05 AM IST

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

Rashee bhavishya
Rashee bhavishya

मेष - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृती बिघडू शकते. आज गुंतवणूक करताना खूप विचार करावा लागेल. कौटुंबिक विरोध संभवतो. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच अडकून पडण्याची शक्यता आहे. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी.

वृषभ - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. दांपत्य जीवनात आनंद दरवळेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतात. एखाद्या रमणीय स्थळी सहलीचे आयोजन करू शकाल.

मिथुन - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्याने आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपार नंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल होईल. वडीलधार्यांच्या आशीर्वादाने तुमचे कार्य तडीला जाईल. नोकरीत बढती संभवते. धन मिळेल.

कर्क - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्ये व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपार नंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्याने मनःस्वास्थ्य मिळेल. आनंदप्राप्तीसाठी खर्च होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. एखाद्याशी वाद व मतभेद होण्याची शक्यता आहे.

सिंह - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र व स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र अती विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळे कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति हाताळू शकाल. पैशाची चणचण भासेल.

कन्या - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. भावनेच्या भरात आपण वाहवत जाण्याची शक्यता आहे. दुपार नंतर दिवस आनंदात जाईल. व्यापारात भागीदारांकडून लाभ होतील.

तूळ - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृश्चिक - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. माते कडून लाभ होईल. दुपार नंतर विचारात एकदम बदल होईल. नवीन कामात अडचणी येतील. बौद्धिक आणि तार्किक कामे करू शकाल. पोटाच्या तक्रारी संभवतात. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे..

धनू - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. मानसिक ताण राहील. स्त्री वर्गाचा प्रसाधनांवर खर्च होईल. घर, जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारात फसवणूक संभवते. विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिने आजचा दिवस अनुकूल आहे.

मकर - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद - विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील. दुपार नंतर मनातील चिंता दूर होतील. मित्र व स्वजनांच्या भेटीने मन आनंदी होईल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांच्या प्रेमाचा आपल्यावर वर्षाव होईल.

कुंभ - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उदभवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. आपण केलेल्या कामाकडे कोणी लक्ष न दिल्याने आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.

मीन - चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. आज वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. कुटुंबीयांकडून सुख मिळेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.