ETV Bharat / bharat

10 February Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज कौटुंबिक सुख मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

author img

By

Published : Feb 10, 2022, 12:01 AM IST

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

मेष - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज स्वतःबद्दलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. भोजन नेहमीच्या वेळेस घेता येणार नाही. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील.

वृषभ - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आज मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल.

मिथुन - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय व संततीशी मतभेद संभवतात. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. भाषा व व्यवहारात नम्रपणे वागावे लागेल.

कर्क - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी व संतती कडून सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

सिंह - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्या कडून लाभ सुद्धा होईल. जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

कन्या - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी व अधिकारी नाराज होतील. संतती विषयक चिंता राहील. त्यांच्याशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांच्या कारवाया वाढतील.

तूळ - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रूं पासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखाद्या गूढ विषयाकडे आपण आकर्षित व्हाल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल. मान - प्रतिष्ठेत वाढ होईल.

धनू - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

मकर - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील. संततीच्या आरोग्य विषयक तक्रारी राहतील.

कुंभ - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आई कडून लाभ होईल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

मीन - आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार व खंबीर मन ह्यामुळे कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांसह प्रवास - पर्यटन होऊ शकेल. भावंडांशी जवळीक वाढेल. सामाजिक मान - सन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.