ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांनो नियोजित कामे पूर्ण करुन घ्या; धनप्राप्तीचा आहे योग, वाचा राशी भविष्य

author img

By

Published : Mar 16, 2023, 5:42 PM IST

Updated : Mar 17, 2023, 6:32 AM IST

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 17 मार्चच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जन्मकुंडलीतील 17 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा राशी भविष्य.

  • मेष : तुमच्यासाठी चंद्र भाग्यात स्थानावर आहे. मात्र तरीही तुम्ही आज एकाद्या अडचणीत सापडू शकाल. तुम्ही करत असलेल्या नोकरीत इतरांशी प्रेमाणे वागा, वाद होण्याची शक्यता आहे. नशीबाची कोणतीही साथ आज मिळणार नाही. दुपारच्या नंतर परिस्थिती बदलेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संभाळावी लागेल.
  • वृषभ : आज तुमच्या राशीसाठी चंद्र अष्टमात आहे. त्यामुळे तुम्ही हळवे होणार आहात. शारीरिक तणाव असल्याने नकारात्मक परिणाम राहील. आज नवे कार्य सुरू करण्यास चांगला काळ नाही. तुमच्या उक्ती व कृतीवर नियंत्रण टेवा. व्यवसायात विघ्न येणार आहेत. त्यामुळे नोकरीतही संघर्ष होणार आहे.
  • मिथून : तुमच्या राशीसाठी आज चंद्र सातव्या स्थानावर राहणार असून धनू राशीत तो स्थिर राहणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस आनंददायक आहे. मनोरंजक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यात आहे. दुपारनंतर तुम्ही हळवे होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होऊ शकते. गैरमार्गाने काम करणे हानिकारक आहे.
  • कर्क : तुमच्यासाठी आज चंद्र सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे आर्थिक लाभाची संधी निर्माण होऊ शकते. तुमच्या कामगिरीमुळे नोकरीत बढतीची संधी आहे. भागीदाराशी योग्य विचारविनिमय करुन निर्णय घ्या.
  • सिंह : चंद्र आज तुमच्या राशीत पाचव्या स्थानी राहणार आहे. साहित्य आणि कला क्षेत्रातील गोडी वाढणार आहे. पोटाच्या तक्रारी वाढणार आहेत. दुपारनंतर आर्थिक अडचण येणार आहे. घरातील वातावरण आज आनंदी राहण्याची शक्यता आहे. व्यापारा लाभ होऊ शकतो.
  • कन्या : चंद्र आज तुमच्या राशीत चौथ्या स्थानावर राहणार आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या आईची प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीवर संकट येण्याची शक्यता आहे. आज प्रवास शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा.
  • तूळ : तुमच्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानावर राहणार आहे. नविन कामाचा शूभारंभ करण्यास अनुकूल दिवस नसल्याने नवीन कामे सहसा टाळा. तुमच्या कुटूंबात आज कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. मानहानी होण्याचीही शक्यता आहे.
  • वृश्चिक : तुमच्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानावर राहणार आहे. तुमच्या एखाद्या वक्तव्याने नातेवाईकांची मने दुखण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. दुपारनंतर मात्र मनावरची मरगळ दूर होण्याची शक्यता आहे.
  • धनू : तुमच्यासाठी चंद्र आज प्रथम स्थानावर राहणार आहे. आजचा दिवस तुम्हाला पलदायी असणार आहे. धनप्राप्ती होण्याचाही योग आहे. त्यामुळे नियोजित कामे पूर्ण करुन घ्या. दुपारनंतर तुमची मनस्थिती द्विधा असेल.
  • मकर : तुमच्यासाठी चंद्र आज बाराव्या स्थानावर असमार आहे. तुम्हाला आज वाणीवर अंकुश लावावा लागणार आहे. तुमच्या वागण्याने भांडण होणार नाही, याचे भान ठेवा. मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. घरातील वातावरण आनंदी राहणार आहे.
  • कुंभ : चंद्र आज तुम्हाला लाभात स्थानावर असल्याने आजचा दिवस फलदायी आहे. तुम्ही आज सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहणार आहात. तरूणांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. दुपारनंतर घरातील वातावरण कलुषित होणार आहे. तुमच्या संतापाला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • मीन : तुमच्यासाठी आज चंद्र आज दशमात स्थानावर असल्याने फलदायी दिवस आहे. आज तुमच्या हातून परोपकार घडण्याची शक्यता आहे. व्यापारातील नियोजनामुळे प्रगती करू शकाल. वडीलधाऱ्याचे आशीर्वाद मिळाल्याने त्यांच्याकडून लाभही मिळू शकतात.
Last Updated :Mar 17, 2023, 6:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.