ETV Bharat / bharat

Hair Fall Control food : 'या' पाच पदार्थांमध्ये आहेत भरपूर प्रोटीन, थांबेल तुमचे केस गळणे

author img

By

Published : Oct 14, 2022, 7:48 PM IST

Updated : Oct 14, 2022, 7:57 PM IST

Hair Fall Control food
केसांची गळती

ठिकाण बदलेले की पाण्याची गुणवत्ता बदलते. त्यामुळे अनेकांना केस गळतीचा त्रास होतो. केस विंचरल्यानंतरही ( Combing Hair ) केसांची गळती थांबत नाही. दिवसभर जेव्हा केसांतून हात फिरवतो. तेव्हा हातात केस येत असतात. गाजर, ड्रायफ्रुट्स, अंडी, एवोकॅडो, पालक अशा पौष्टिक फळांनी केसांना आवश्यक घटक मिळतात. त्यांच्या सेवनाने केस मजबूत होतात. ज्या फळांमध्ये व्हिटॅमिन ई आढळते. ती फळे केसांचे आरोग्य राखण्यास आणि ते लांब करण्यास मदत करतात.

मुंबई : आजकाल प्रदूषण, धूळ, केसांतील कोंडा, केसांतील घाम आणि मातीमुळे केस निरोगी ठेवणे कठीण झाले आहे. बहुतेक महिलांना त्यांचे केस लांब, मजबूत हवे असतात. पण जाड आणि चमकदार केस मिळणे सध्याच्या काळात कठीण झाले आहे. परंतू सध्याच्या गोंधळलेल्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि त्यांची वाढ मंदावते. चला जाणून घेऊया ते कोणते पदार्थ आहेत. ज्यांच्या सेवनाने तुम्ही केस लांबच नाही तर ते मजबूत देखील करू शकता. ( Food for long hair growth )

गाजर : गाजरात व्हिटॅमिन ए विशेषत: आढळते, जे डोक्याच्या पेशींच्या वाढीस मदत करते आणि केसांना चमकदार बनवते. गाजर ही जमिनीखाली उगवणारी अशी भाजी आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

ड्रायफ्रुट्स : ड्रायफ्रुट्स खाण्याचे अनेक फायदे ( Dry Fruits For Long Hairs ) आहेत. परंतू याद्वारे आपण केस मजबूत करू शकतो आणि ते वाढवू शकतो. तुम्ही बदाम, अक्रोड आणि काजू यांसारखे ड्रायफ्रुट्स नियमितपणे खाऊ शकता. रात्री भिजवून खाल्यास त्याचा चांगला अनुभव पहायला मिळतो.

एवोकॅडो : एवोकॅडो ( avocado ) हे खूप पौष्टिक फळ आहे. त्याच्या सेवनाने केस मजबूत होतात. या फळामध्ये व्हिटॅमिन ई आढळते. जे केसांचे आरोग्य राखण्यास आणि ते लांब करण्यास मदत करते. अनेक अभिनेत्री किंवा सुदर महिला त्यांच्या आहारात एवोकॅडो चा वापर करतात. ज्यामुळे त्यांचे केस तर चांगले बनतातच पण त्वचाही मचकदार बनते.

पालक : पालक स्नायूंची ताकद आणि हाडांचे आरोग्य वाढवते. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. हिरव्या पालेभाज्या खा असे डॉक्टरही नेहमी सांगतात. याशिवाय पालकाच्या सेवनाने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. पालक नियमित खाल्याने केस, नखे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. तुम्ही पालकाचा आहारात समावेश करून पोषक घटकांची कमतरता भरून काढू शकता.

अंडी : प्रथिने मिळविण्यासाठी आपण अंडी ( Egg For Long Hairs ) खातो. त्यात बायोटिन, व्हिटॅमिन डी3, व्हिटॅमिन बी आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड देखील असतात, ज्यामुळे केसांच्या वाढीचा वेग वाढतो. खाण्याव्यतिरिक्त केसांना अंडी लावल्यानंतर डोके धुणे देखील फायदेशीर आहे. यामुळे केसांना पोषण मिळते.

Last Updated :Oct 14, 2022, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.