ETV Bharat / bharat

Bhagat Singh Koshyari: 'मला न मागता मिळाले राज्यपालपद', भाषणा दरम्यान राज्यपाल झाले भावूक

author img

By

Published : Oct 29, 2022, 9:26 PM IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) शनिवारी विद्या भारती परिवाराने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आपले कासगंजमध्ये घालवलेले दिवस आठवून कोश्यारी भावूक झाले. (Bhagat Singh Koshyari became emotional).

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

कासगंज (उत्तरप्रदेश): महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) शनिवारी विद्या भारती परिवाराने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आपले कासगंजमध्ये घालवलेले दिवस आठवून कोश्यारी भावूक झाले. (Bhagat Singh Koshyari became emotional). राज्यपाल कोश्यारी यांचे कासगंज जिल्ह्याशी जुने नाते आहे. शहरातील विलराम गेट येथील सरस्वती शिशु मंदिर विद्यालयात ते 1966 ते 1971 या काळात प्राचार्य म्हणून कार्यरत होते.

मला न मागता मिळाले राज्यपालपद: कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, मला कासगंजमध्ये येऊन खूप आनंद होत आहे. मला समाजसेवेत आणि मानवसेवेत अतिशय आनंद मिळतो. 'बिन मांगे मोती, मांगे मिले ना भीख' हे माझे सूत्र असून मला न मागता राज्यपालपद मिळाले, असेही ते म्हणाले. कोश्यारी पुढे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अटलबिहारी वाजपेयीही पंतप्रधान झाले आणि आज नरेंद्र मोदीही पंतप्रधान झाले आहेत. पूर्वी लोक मोठमोठ्या घोषणा करायचे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक घरात शौचालय बांधले. प्रत्येक घरात वीज गॅस कनेक्शन दिले जाते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोश्यारी भाषणादरम्यान भावूक झाले होते आणि कासगंजमध्ये घालवलेले जुने दिवस आठवून त्यांना अश्रू अनावर झाले. राज्यपाल म्हणाले की, मी कासगंजचा ऋणी आहे. येथे अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्ती आहेत. पंतप्रधानांना देशाला पुढे न्यायचे आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.