ETV Bharat / bharat

कॉलेजियम शिफारशीतील तीन महिलांसह 9 न्यायाधीशांच्या बढत्यांना केंद्राकडून हिरवा कंदील

author img

By

Published : Aug 26, 2021, 4:19 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये न्यायाधीश यु. यु. ललित, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचुड आणि एल. नागेश्वर राव यांचा समावेश आहे. या कॉलिजियमने तीन महिला न्यायाधीशांची शिफारस केल्याचे सूत्राने साांगितले.

तीन महिलांसह 9 न्यायाधीशांची नियुक्ती
Government clears 9 names

नवी दिल्ली - तीन महिला न्यायाधीशांसह नऊ महिला न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयात बढती करण्याच्या कॉलेजियमच्या शिफारसीला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात तीन महिला न्यायाधीशांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाल आहे. महिल्या न्यायाधीशांमध्ये बी. व्ही. नागरत्ना (कर्नाटक दिल्ली उच्च न्यायालय), न्यायाधीश हिमा कोहली (तेलंगाणा उच्च न्यायालय) आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी (गुजरात उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एफ. नरिमन हे 12 ऑगस्टला निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 25 वर आली आहे. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची 34 पदे मंजूर आहेत. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगाई हे 19 मार्च 2019 रोजी निवृत्त झाल्यानंतर बढती होऊन सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

हेही वाचा-TMC MP अभिनेत्री नुसरत जहांला पुत्ररत्न; पती निखिल जैन म्हणाले होते, हे बाळ माझे नाही

महिला न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न पुढील सरन्यायाधीश होण्याची शक्यता-

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये न्यायाधीश यु. यु. ललित, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचुड आणि एल. नागेश्वर राव यांचा समावेश आहे. या कॉलेजियमने तीन महिला न्यायाधीशांची शिफारस केल्याचे सूत्राने साांगितले. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न या पुढील सरन्यायाधीश होऊ शकतात, असे सूत्राने सांगितले.

हेही वाचा-तालिबानींकडून हत्या नव्हे मारहाण- अफगाणिस्तानच्या पत्रकाराचा खुलासा

इतर 9 जणांच्या शिफारशीमध्ये यांचा समावेश-

सुत्राच्या माहितीनुसार इतर नावांमध्ये अभय श्रीनिवास ओक (कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश), न्यायाधीश विक्रम नाथ (गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, न्यायाधीश जितेंद्र कुमार माहेश्वरी (सिक्किम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश), न्यायाधीश सी. टी. रवीकुमार (केरळ उच्च न्यायालय) आणि न्यायाधीश एम. एम. सुंदरेश (केरळ उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे.

हेही वाचा-धक्कादायक! जेएनयूच्या कॅम्पसमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतच्या रिपोर्टबाबत सरन्यायाधीशांना व्यक्त केली होती नाराजी

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतची शक्यता व त्याबाबतचा माध्यमातील रिपोर्ट अत्यंत दुर्दैवी असल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी म्हटले होते. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया अत्यंत पवित्र आहे. त्याच्याशी पावित्र्य जोडलेले आहे. माध्यमांनी हे पावित्र्य समजून घ्यावे आणि ओळखावे, असेही सरन्यायाधीश रमणा यांनी म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.