ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : गोव्यात किती आहेत उमेदवार, एकूण किती मतदारसंघ, किती मतदार बजावणार हक्क.. पाहा संपूर्ण आकडेवारी

author img

By

Published : Feb 12, 2022, 8:42 PM IST

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार ( Goa Assembly Election 2022 Voting ) आहे. या निवडणुकीत किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत? किती उमेदवार आपले राजकीय भवितत्व आजमावणार आहेत? किती मतदार संघ गोव्यात आहेत? मतदानासाठी किती बूथ आहेत? या सर्वांचा आढावा आपण घेणार आहोत या स्पेशल रिपोर्ट मधून..

गोवा विधानसभा निवडणूक २०२२
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ( दि. १४ ) मतदान प्रक्रिया पार पडणार ( Goa Assembly Election 2022 Voting ) आहे. यंदा गोव्याच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. अनेक राजकीय पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. तर काही पक्षांनी अनुभवींना प्राधान्य दिले आहे. अनेक नवमतदार यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोव्यातील या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे या रिपोर्टमधून..

११ लाख मतदार, १७२२ मतदान केंद्र

गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ११ लाख ५६ हजार ७६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ लाख ६२ हजार ७९० पुरुष तर ५ लाख ९३ हजार ९६८ महिला मतदार आहेत. तर ४ तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

४० मतदारसंघांसाठी ३०१ उमेदवार मैदानात

गोव्यात एकूण ४० मतदारसंघ आहेत. या ४० मतदारसंघांसाठी एकूण ५८७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी ३८२ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर, १५३ अर्ज अवैध ठरले. यामध्ये ३४ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ३०१ उमेदवार आता रिंगणात आहेत. दक्षिण गोव्यातून १५४ तर उत्तर गोव्यातून १५६ उमेदवार भवितव्य आजमावणार आहेत.

२६ महिला तर २७५ पुरुष उमेदवार

गोव्याच्या निवडणुकीत यंदा फक्त २६ महिला उमेदवारच निवडणूक लढवत आहेत. त्या तुलनेत २७५ पुरुष मतदार निवडणुकीत उभे आहेत. यापैकी ६८ उमेदवार हे अपक्ष आहेत ( Woman Candidates In Goa Assembly Election 2022 ) .

सिलोम मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार

विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील सिलोम मतदारसंघात सर्वाधिक १३ उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तर सर्वात कमी ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ५ उमेदवार आहेत. पोंडा मतदारसंघातून ७५ वर्षीय रवी नाईक हे उमेदवारी करत आहेत. तर २६ वर्षीय सुजय गौस हे संकेलीअम आणि मोहम्मद रेहान मुजावर हे नवेलीअम मतदारसंघातून उभे आहेत.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?

गोव्यात भाजपने सर्वाधिक ४० उमेदवार उभे केले आहेत. त्याखालोखाल आम आदमी पक्षाने ३९, रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीने ३८, काँग्रेसने ३७, तृणमूल काँग्रेसने २६, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने प्रत्येकी १३, शिवसेनेने ११ आणि अपक्ष ६८ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.

२०१७ मध्ये जास्त जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेबाहेर

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक १७ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. तर भाजपने १३ जागा जिंकल्या. मात्र असे होऊनही भाजपने फोडाफोडी करत इतर आमदारांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली होती.

'या' नेत्यांकडे आहे मोठी संपत्ती

गोव्याच्या राजकारणातील एक मोठे नाव म्हणजे मायकल लोबो ( MLA Michael Lobo ). लोबो हे बारदेश तालुक्यातील मंत्री व आमदार आहेत. ते कलंगुट मतदारसंघातून तर पत्नी डिलियाना लोबो ( Delilah Lobo ) शिवोली मतदारसंघातून राजकीय भवितव्य आजमावत आहे. त्यांच्याकडे ९२ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या खालोखाल बिचोलिम मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत शेट्ये यांच्याकडे ५९ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

भाजपचे ३८ उमेदवार करोडपती

निवडणूक आयोगाला उमेदवारांनी सादर केलेल्या माहितीनुसार भाजपचे सर्वाधिक ३८ उमेदवार हे करोडपती आहेत. तर काँग्रेसचे ३२, आम आंदमीचे २४, तृणमूलचे १७ तर आरजीपीचे १० उमेदवार करोडपती आहेत. शिलोम मतदारसंघातील जय महा भारत पक्षाचे उमेदवार जगन्नाथ गावकर आणि वाळपोई मतदारसंघातील एसएचएसचे उमेदवार देविदास गावकर यांच्याकडे सर्वात कमी २५ हजार रुपयांची मालमत्ता आहे ( Crorepati Candidates In Goa Assembly Election 2022 ) .

आठ उमेदवार पाचवी पास

गोव्यात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी ५ उमेदवार हे अवघे पाचवी पास आहेत. तर १९ उमेदवार आठवी पास, ५० उमेदवार दहावी पास आणि ६१ उमेदवार हे बारावी पास आहेत. उच्च शिक्षित उमेदवारांमध्ये ६७ उमेदवार पदवीधर आहेत. २६ उमेदवार उच्च पदवीधर तर अवघा एक उमेदवार डॉक्टरेट झालेला आहे ( Goa Assembly Election Education Of Candidates ) .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.