ETV Bharat / bharat

Gayatri Jayanti 2023 : काय आहे गायत्री जयंती ? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि पूजाविधी...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 3:25 PM IST

गायत्री जयंती सनातन धर्मात विशेष मानली जाते. गायत्री जयंती देवी गायत्रीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरी करतात. गायत्री देवीला वेदांची देवी असे म्हणतात. त्यामुळे या देवीला वेद माता असेही म्हणतात. जाणून घ्या विद्यार्थी दशेत गायत्री जयंती निमित्त काय करावे म्हणजे योग्य फळ मिळेल.

Gayatri Jayanti 2023
गायत्री जयंती 2023

हैदराबाद : माता गायत्रीचा जन्म श्रावण पौर्णिमेच्या दिवशी झाला असे शास्त्रानुसार मानले जाते. त्यामुळे हा दिवस गायत्री जयंती म्हणून साजरा केला जातो. दक्षिण भारतातील बहूतेक लोक श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला गायत्री जयंती उत्साहात साजरी करतात. अनेक ठिकाणी ज्येष्ठ चंद्र मासातील शुक्ल पक्षातील एकादशीच्या तिथीला देखिल गायत्री जयंती मानली जाते.

  • कधी आहे गायत्री जयंती 2023 : वैदिक दिनदर्शिकेनुसार श्रावण शुक्ल पक्षाची पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 वाजता सुरू होते आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07.05 वाजता संपते. त्यामुळे उदय तिथीनुसार गायत्री जयंती 31 ऑगस्ट 2023 रोजी गुरुवारी साजरी करतील.
  • काय आहे गायत्री जयंतीचे महत्त्व : गायत्री जयंती हा दिवस श्रावण पौर्णिमेला साजरा करतात. या दिवसाला संस्कृत दिन असेही म्हणतात. देवी गायत्री ही सर्व देवांची आई असल्याचे मानले जाते. देवी सरस्वती, देवी पार्वती आणि देवी लक्ष्मी यांचा अवतार असल्याचे देखिल मानले जाते. तसेच गायत्री मंत्राला महामंत्र असेही म्हटले जातं. हिंदू धर्मात याला सर्वोत्कृष्ट महत्त्व दिलं गेलंय.
  • विद्यार्थ्यांनी करावेत हे उपाय : गायत्री जयंतीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी सूर्योदयापूर्वी उठावे. अंघोळ करून पूर्वेकडे तोंड करून पूजा करणयास बसावे. बसण्यासाठी लाल रंगाचं आसन वापरावं.
  • अशा प्रकारे करा मंत्राचा जप : विद्यार्थी दशेत गायत्री मंत्राचा जप केल्याने खुप फायदे होतात. हा जप करण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून घ्या, ते पाणी तुळशीला घाला. तुपाचा दिवा लावा आणि रुद्राक्ष माळेने गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करा.
  • शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळेल : हा जप केल्यावर घरामध्ये पाणी शिंपडा आणि तुळशीची पानं खा. असे नियमित केल्याने विद्यार्थ्यांची बुद्धी तीक्ष्ण होते. त्यामुळे त्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळतं.

हेही वाचा :

  1. Sawan Putrada Ekadashi २०२३ : पुत्रदा एकादशीची आज कशी करावी पूजा? जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त
  2. Varalakshmi Vratham 2023 : श्रावणमध्ये माता वरलक्ष्मीची कशी करावी पूजा? जाणून घ्या व्रताची पद्धत
  3. Love horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींचा आनंदात जाईल वेळ; वाचा लव्हराशी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.