ETV Bharat / bharat

Former Pakistan Minister Arrested : इमरान खान पाठोपाठ पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री मखदूम शाह महमूद कुरैशीही अटकेत

author img

By

Published : May 11, 2023, 12:47 PM IST

पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ ( PTI ) पक्षाचे नेते तथा माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर मोठ्या दंगली उसळल्या आहेत. त्यामुळे या पाकिस्तान पोलिसांनी माजी परराष्ट्र मंत्री तथा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे उपाध्यक्ष मखदूम शाह महमूद कुरैशी यांना अटक केली आहे.

Former Pakistan Minister Arrested
मखदूम शाह महमूद कुरैशी

इस्लामाबाद : माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये गृहकलह सुरू झाला आहे. त्यात आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री तथा तेहरिक ए इन्साफ पक्षाचे ( PTI ) उपाध्यक्ष मखदूम शाह महमूद कुरैशी यांना गुरुवारी इस्लामाबाद पोलिसांनी अटक केली आहे. माजी परराष्ट्र मंत्री मखदूम शाह महमूद कुरैशी यांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले आहे. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या वतीनेही उपाध्यक्ष मखदूम शाह महमूद कुरैशी यांना इस्लामाबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली आहे. त्यांना अज्ञात ठिकाणी हलवल्याचेही तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या वतीने गुरुवारी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये नमूद आहे.

दंगली प्रकरणी केली कारवाई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली उसळत आहेत. नागरिकांनी अनेक सरकारी कार्यालयावर हल्ले केले आहेत. त्यातच पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील भागात मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या आहेत. पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील दंगली आणि जाळपोळ प्रकरणी कुरेशी पोलिसांना हवे आहेत. त्यामुळे बुधवारी दुपारी पोलिसांनी इस्लामाबादमधील गिलगिट बाल्टिस्तान हाऊसमधून मखदूम शाह महमूद कुरैशी यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

हिंसक आंदोलनात 50 जणांचा बळी : पाकिस्तानी माजी परराष्ट्र मंत्री कुरेशी यांना अटक केल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले. अटक करण्यापूर्वी कुरेशी यांनी पीटीआय कार्यकर्त्यांना देशातील खर्‍या स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले. आपण काहीही चुकीचे केले नसल्यामुळे आपल्याला कोणताही पश्चात्ताप होत नाही. पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर उफाळलेल्या हिंसक आंदोलनात 50 जणांचा बळी गेला. त्याबद्दल माजी परराष्ट्र मंत्री मखदूम शाह महमूद कुरैशी यांनी शोक व्यक्त केला.

बलिदान आवश्यक आहे : अटकेनंतर माजी परराष्ट्र मंत्री मखदूम शाह महमूद कुरैशी यांनी 50 जणांचा बळी गेल्यामुळे शोक व्यक्त केला. मात्र योग्य कारणांसाठी बलिदान आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पीटीआयचे कार्यकर्ते आपले काम सुरुच ठेवतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यासह आपला संघर्ष सुरुच ठेवण्याचे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केले. इम्रान खानची सुटका होईपर्यंत या पक्षकार्यात टिकून राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

कॉर्प्स कमांडर लाहोर घटनेचा आरोप चुकीचा : पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इमरान खान यांच्यासह माजी परराष्ट्र मंत्री मखदूम शाह महमूद कुरैशी यांच्यावर कॉर्प्स कमांडर लाहोर घटनेचा आरोप करण्यात आला आहे. मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे सांगत कुरेशी यांनी तो फेटाळून लावला आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केले. पीटीआय ही स्वातंत्र्याची चळवळ असून त्यात प्रत्येकाने योगदान दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा -

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष; 'हे' पाच न्यायामूर्ती देणार निकाल

Amritsar Blast : अमृतसर सुवर्ण मंदिर परिसर तिसऱ्यांदा स्फोटाने हादरला, 5 संशयितांच्या आवळल्या मुसक्या

Maharashtra Political Crisis : सत्ता की पुन्हा संघर्ष आज होणार फैसला, राज्यपालांची कृती ठरणार घटनाबाह्य; जाणून घ्या काय म्हणाले घटनातज्ज्ञ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.