ETV Bharat / bharat

Former Minister Haji Yakoob Qureshi Sentenced : पोलिसाला मारहाण केल्याने उत्तर प्रदेशच्या माजी मंत्र्याला न्यायालयाने ठोठावली शिक्षा

author img

By

Published : Apr 26, 2023, 10:02 AM IST

पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी बसपाच्या माजी मंत्र्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. हाजी याकूब कुरेशी असे त्या माजी मंत्र्याचे नाव असून कुरेशी सध्या सोनभद्र कारागृहात कैद आहे.

Former Minister Haji Yakoob Qureshi Sentenced
संपादित छायाचित्र

मेरठ : कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण करने उत्तर प्रदेशातील माजी मंत्र्याला चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने माजी मंत्र्याला शिक्षा ठोठावली आहे. हाजी याकूब कुरेशी असे त्या न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या उत्तर प्रदेशातील माजी मंत्र्याचे नाव आहे. हाजी याकूब कुरेशीने 2011 मध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती. सध्या हाजी याकूब कुरेशी सोनभद्र कारागृहात कैद आहे.

मंत्र्याला थांबवल्याने पोलिसाला मारहाण : चाहन सिंग हे राज्य पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत होते. 17 मार्च 2011 ला राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या याकूब कुरेशीने पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करत मारहाण केली होती. लिसाडी गेट पोलीस नियंत्रण कक्षात चाहन सिंग हे तैनात होते. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षाच्या आदेशानुसार हापूर स्टँड चौकात ड्युटी करत होते. त्याचवेळी एक जीप हुटर वाजवत जात होती. यावेळी चाहन सिंगने त्या जीपला थांबण्याचे संकेत दिले होते. दरम्यान मागून काळ्या रंगाच्या कारमधून याकूब कुरेशी तेथे पोहोचल्याने त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी मंत्री याकूब कुरेशीने गैरवर्तन करत चाहन सिंगला मारहाण केली. त्यांचा कर्तव्यावरील गणवेशही फाडला.

न्यायालयाच्या आदेशावरुन झाला गुन्हा दाखल : याकूब कुरेशीने पोलिसांसोबत मारहाण केल्यामुळे या घटनेत चाहन सिंग गंभीर जखमी झाले होते. जखमी चाहन यांना जसवंत राय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे चाहन सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून हाजी याकूब कुरेशीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चाहन सिंग यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी याकूब कुरेशीविरुद्ध कलम 323, 333, 504,506 अन्वये आरोपपत्र दाखल केले.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोषी : चाहन सिंग यांना मारहाण केल्यानंतर याकूब कुरेशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चाहन सिंग, अतुल कुमार गौतम यांच्यासह ७ पोलिसांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी याकूब कुरेशीला कलम 333 कलमानुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोषी ठरवले. मेरठ येथील खासदार, आमदार अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश प्रमोद कुमार यांनी आरोपीला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती चाहन सिंग यांच्या बाजुने लढणारे एडीजीसी वीरेश त्यागी यांनी स्पष्ट केले.

शिपायाने लढवली मंत्र्याविरोधात निवडणूक : न्यायालयाने याकूब कुरेशीला 4 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिना कारावास भोगावा लागणार आहे. मात्र, न्यायालयाने कुरेशीला कलम 323 अन्वये मारहाणीच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत शिपाई चाहन सिंह यांनी याकूब कुरेशीविरोधात निवडणूक लढवली होती. चाहन सिंग यांनी मेरठच्या दक्षिण विधानसभा मतदार संघातून ही निवडणूक लढवली होती. त्‍यावेळी त्‍यांचा हेतू निवडणूक जिंकण्याचा नसून याकूबला पराभूत करण्‍याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा - New Delhi Crime News : मॅट्रीमोनियल साईटवरून तब्बल 700 तरुणींची फसवणूक, दोन नायजेरियन भामट्यांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.