ETV Bharat / bharat

Draining Water For Phone : व्वा रे पठ्ठ्या . . सेल्फी घेताना मोबाईल पडला तलावात, अधिकाऱ्याने फोनसाठी तलाव केला रिकामा

author img

By

Published : May 27, 2023, 1:01 PM IST

सेल्फी घेताना अधिकाऱ्याचा मोबाईल तलावात पडल्याने पठ्ठ्याने अख्खा तलाव इंजिन लाऊन रिकामा केला. लाखो लिटर पाणी अधिकाऱ्याच्या मोबाईल फोनसाठी सोडून दिल्याने शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे.

Draining Water For Phone
पाणी सोडताना अधिकारी

रायपूर : तलावाच्या काठावर फिरायला गेलेल्या अधिकाऱ्याचा मोबाईल फोन जलाशयात पडल्याने अन्न अधिकाऱ्याने चक्क तलावातील लाखो लिटर पाणी सोडून देत फोनचा शोध घेतला. मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी केल्याने आता शेतकऱ्यांवर रडायची वेळ आली आहे. ही घटना छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात घडली आहे. राजेश विश्वास असे त्या जलाशयातील पाणी सोडून मोबाईलचा शोध घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

एक लाखाचा मोबाईल पाण्यात : अन्न निरीक्षक असलेल्या राजेश विश्वास यांचा फोन जलाशयात पडल्यामुळे गावकऱ्यांनी त्या फोनचा शोध घेतला. मात्र फोनचा शोध न लागल्याने एक लाख रुपयाच्या मोबाईल फोनसाठी राजेश विश्वास यांनी अख्खा तलाव रिकामा केल्याने खळबळ उडाली. या जलाशयातील पाण्यावर लाखो शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. मात्र आता अधिकाऱ्याने मोबाईल फोनसाठी पाणी सोडून दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सेल्फी घेताना पाण्यात पडला मोबाईल : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात केरकट्टा येथे ही घटना घडली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने राजेश विश्वास या अधिकाऱ्याने आपल्या मित्रासोबत केरकट्टा धरणाला भेट दिली. तो सेल्फी घेत असताना त्याचा एक लाख रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल जलाशयाच्या बंधाऱ्यातील पाण्यात पडला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राजेशने गावकऱ्यांना मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले. मात्र मोबाईल सापडला नाही.

डिझेल इंजिन आणून काढले पाणी : राजेश विश्वास या अधिकाऱ्याचा फोन सेल्फी घेताना धरणाच्या जलाशयात पडला. मात्र जलाशयाच्या पाण्यात पडलेल्या मोबाईलचा स्थानिकांनी शोध घेऊनही मोबाईल सापडला नाही. त्यामुळे अधिकारी राजेशने डिझेल इंजिन आणून पाणी काढले. त्यामुळे जलाशयातील 41 लाख लिटर पाणी वाया गेले. एवढ्या प्रमाणात पाणी शेतीसाठी वापरले असते तर 1500 एकर शेतीसाठी पुरेसे होते, असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पाण्याची नासाडी केल्याने निलंबन : एक लाख रुपये किमतीच्या मोबाईलसाठी शेतकऱ्यांच्या वापराच्या पाण्याची अधिकारी राजेशने नासाडी केली. त्यामुळे जलाशयातील पाणी सोडणाऱ्या राजेश विश्वास या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. इतके पाणी वाहून गेल्यावर मोबाईलमध्ये पाणी शिरल्याने मोबाईल खराब झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या पाण्याची नासाडी झाली, अन् मोबाईलही खराब झाला.

मोबाईलमध्ये महत्वाची कागदपत्र : मोबाईल फोनसाठी मौल्यवान पाणी वाया घालवणाऱ्या अधिकारी राजेशवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र यात आपली अजिबात चूक नसल्याचा दावा राजेशने केला आहे. मोबाईलमध्ये कार्यालयाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे असल्याने तो पाण्यातून काढावा लागल्याचे राजेशने सांगितले. त्यामुळे पाणी बाहेर काढण्यात आले. वरिष्ठांच्या परवानगीने जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्याचा दावाही राजेशने केला आहे. हे पाणी शेती आणि पिण्यासाठी योग्य नसल्याचे उत्तर राजेशने दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. IMD Alert Thunderstorm In Delhi : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा दिल्लीत इशारा; अनेक विमान उड्डाणे रद्द, नागरिकांना फटका
  2. Nashik Water Crisis : नाशिकमध्ये पाणी टंचाई; महिलांना खोल विहिरीत उतरून भरावं लागतंय पाणी
  3. Water Crisis In Mumbai :मुंबईकरांनो पाणी जपून वापरताय ना! आज आणि रविवारी पाणीपुरवठा असेल बंद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.