ETV Bharat / bharat

खाद्यप्रेमींची माणुसकी... सायकलरून झोमॅटोची डिलिव्हरी देणाऱ्या अकीलला दिली दुचाकी गिफ्ट

author img

By

Published : Jun 21, 2021, 11:28 AM IST

सायकलरून झोमॅटोची डिलिव्हरी देणाऱ्या अकीलला दिली दुचाकी गिफ्ट
सायकलरून झोमॅटोची डिलिव्हरी देणाऱ्या अकीलला दिली दुचाकी गिफ्ट

अकीलने मला पार्सल घेण्यासाठी खाली बोलावले तेव्हा, मी पाहिले की तो सायकलवर आला होता. त्यावेळी पाऊस चालू होता. विशेष म्हणजे पडत्या पावसात ही त्याने वेळेत अन्नाची डिलिव्हरी दिली होती. त्यावेळी मुकेश यांनी अकील याचा सायकलवर आल्याचा एक फोटो काढला आणि समाज माध्यमांवरील खाद्यप्रेमींच्या ग्रुपवर शेअर केला. त्यातील काही सदस्यांनी प्रतिक्रिया दिल्या की अकीलला काही तर मदत केली पाहिजे.

हैदराबाद - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आल्यानंतर अनेकजण आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही मदतीचा हात पुढे करत आहेत. हैदराबादमध्ये झोमॅटोची सेवा देणाऱ्या डिलिव्हरी मॅन मोहम्मद अकील याला शहरातील काही खाद्य प्रेमींनी एक दुचाकी खरेदी करून भेट दिली आहे. झोमॅटोच्या एका ग्राहकाला ज्यावेळी हे लक्षात आले की अकील हा पार्सल पोहोच करण्यासाठी सायकलवर तेही वेळेत येत आहे. मात्र, दुचाकी घेण्यासाठी त्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यावेळी माणुसकीच्या नात्याने त्यांनी अकीलला दुचाकी भेट दिली आहे.

सायकलरून झोमॅटोची डिलिव्हरी देणाऱ्या अकीलला दिली दुचाकी गिफ्ट

अकील हा १४ जून रोजी ग्राहक रुबिन मुकेश यांनी मागवलेले अन्नाचे पार्सल देण्यासाठी गेला होता. त्यावेळी रुबिन यांच्या घराजवळ जाऊन अकिलने त्यांना पार्सल घेण्यासाठी बाहेर बोलावले. त्यावेळी अकील ते अन्नाचे पार्सल देण्यासाठी सायकलवर त्या ठिकाणी आल्याचे रुबिन यांना दिसून आले.

आयटी प्रोफेशनल मुकेश यांनी सांगितले की, अकीलने मला पार्सल घेण्यासाठी खाली बोलावले तेव्हा, मी पाहिले की तो सायकलवर आला होता. त्यावेळी पाऊस चालू होता. विशेष म्हणजे पडत्या पावसात ही त्याने वेळेत अन्नाची डिलिव्हरी दिली होती. त्यावेळी मुकेश यांनी अकील याचा सायकलवर आल्याचा एक फोटो काढला आणि समाज माध्यमांवरील खाद्यप्रेमींच्या ग्रुपवर शेअर केला. त्यातील काही सदस्यांनी प्रतिक्रिया दिल्या की अकीलला काही तर मदत केली पाहिजे.

समाजमाध्यमावरच्या त्या खाद्यप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी अकील मदत करण्यासाठी वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. कारण अकीलचे त्याच्या कामाप्रति असलेली प्रामाणिकता म्हणून त्या पैशातून त्याला भेट देण्याचे त्यांनी निर्धारित केले. त्यातून त्यांनी दुचाकी घेण्याचे निश्चि केले होते. १४ जूनला फेसबुकबर पोस्ट टाकल्यानंतर त्याच्या दुचाकीसाठी ६५ हजार रुपये गोळा करण्याचे नियोजित होते. प्रत्यक्षात मात्र ७५ हजार रुपये गोळा झाले.

या खाद्यप्रेमी सदस्यांनी १८ जूनला अकीलसाठी एक दुचाकी, त्यासोबत हेल्मेट, सॅनिटायझर, रेनकोट आणि मास्क खरेदी करून अकीलला भेट दिली. अकील हा २१ वर्षीय विद्यार्थी असून तो बीटेक करत आहेत. तो सध्या बीटेकच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या हलाखीच्या परिस्थितीत खाद्यप्रेमींनी त्याला दिलेल्या या मदतीमुळे त्याने या सर्वाचं मनापासून आभार व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.