ETV Bharat / bharat

विमानाला उशिर झाल्यानं संतापला प्रवासी, थेट पायलटलाच केली मारहाण

author img

By ANI

Published : Jan 15, 2024, 10:19 AM IST

Passenger Assaults Indigo Pilot : दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानात एका प्रवाशानं पायटला धक्काबुक्की केली. पायलट विमानाला उशीर झाल्याची घोषणा करत होता. हे विमान 13 तास उशिरानं निघाल्याचं सांगण्यात येतंय.

Passenger Assaults Indigo Pilot
Passenger Assaults Indigo Pilot

नवी दिल्ली Passenger Assaults Indigo Pilot : दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. त्यातच दाट धुक्यामुळं अनेक विमानं उशिरानं उड्डाण करत आहेत. दरम्यान, इंडिगोच्या विमानात उड्डाणाला उशीर झाल्यामुळं प्रवाशानं संतापून थेट पायलटलाच धक्काबुक्की केली. यानंतर विमानमध्ये एकच गोंधळ उडाला. हे धक्कादायक प्रकरण दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलं आहे.

नेमकं काय घडलं : इंडिगोच्या विमानाला उशीर झाल्यामुळं वैतागलेल्या एका प्रवाशानं वैमानिकाला धक्काबुक्की केल्याचं समोर आलंय. धुक्यामुळं उड्डाणाला विलंब होत होता. मात्र, प्रवाशांना योग्य माहिती दिली जात नव्हती. याप्रकरणी आयजीआय पोलिसांकडं तक्रार करण्यात आलीय. आयजीआय पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केलाय. आम्ही आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करु, असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात एव्हिएशन सिक्युरिटी एजन्सीनं तपास सुरु केला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी 7 वाजता घडली असून हे विमान दिल्लीहून गोव्याला जात होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय.

  • A passenger hit an IndiGo captain inside the aircraft while the pilot was making an announcement.

    Delhi Police says "We will take appropriate legal action against the accused"

    (Screengrab of a viral video) pic.twitter.com/5YYbNGE3sI

    — ANI (@ANI) January 15, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हायरल व्हिडिओत काय : व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसतंय की, विमानात बसलेल्या एका प्रवाशानं विमानाच्या पायलटला उड्डाणाच्या विलंबाबाबत घोषणा करत असताना मारहाण केली. या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पिवळा हुडी घातलेला एक प्रवासी अचानक शेवटच्या रांगेतून धावत आला. त्यानं पायलटला धक्काबुक्की केली. इंडिगोचं हे विमान 13 तास उशिरानं आल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आलाय.

  • धुक्यामुळं शंभारहून अधिक विमानं उशिरा : उत्तर भारतात पडत असलेल्या धुक्यामुळं आज 110 उड्डाणं उशीरा झाली असून 79 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. सरासरी विलंब 50 मिनिटांपर्यंत पोहोचलाय. विमानांना उशीर होत असल्यानं प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. त्यांना त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचण्यासाठी तासंतास वाट पाहावी लागतेय.

(डिस्क्लेमर- व्हायरल व्हिडिओबाबतच्या सत्यतेची ईटीव्ही भारत पुष्टी करत नाही.)

हेही वाचा :

  1. उत्तर भारतात धुक्याचा कहर; दिल्लीहून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे 10-12 तास उशिरा, प्रवाशांचे हाल
  2. दाट धुक्यामुळं मुंबईवरून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाचं ढाका विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.