ETV Bharat / bharat

बिहारमध्ये मुसळधार पाऊस; 40 पेक्षा जास्त गावे प्रभावित

author img

By

Published : Jul 4, 2021, 1:31 PM IST

संततधार पावसामुळे बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. पुराचे पाणी अनेक गावात शिरले आहे.

Flood in many villages of Bihar
बिहारमध्ये मुसळधार पाऊस

पाटणा - बिहारमध्ये सध्या मुसळधार पाऊस (Rain in Bihar) सुरू आहे. त्यामुळे नद्या (Rise in Water Level of Major Rivers) धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना स्थलांतर करावे लागत आहे. जलसंपदा विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजता वीरपूर बैराज येथील कोसी नदीचा जलस्तर 2.21 लाख क्यूसेक पर्यंत पोहोचला आहे.

बिहारमध्ये मुसळधार पाऊस

दोन नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत -

दरम्यान, गंडक नदीचा प्रवाह वाढताना दिसून येत आहे. सकाळी 10 वाजता या नदीचा प्रवाह 2.21 लाख क्यूसेक नोंदवण्यात आला होता. तर दुपारी 2 वाजेच्या सुमारास 2.76 लाख क्यूसेक नोंदवण्यात आला. तसेच गंडक नदीचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच बागमती नदी सुद्धा धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

बिहारमध्ये मुसळधार पाऊस

पश्चिम चंपारण आणि गोपालगंजमध्ये पुराचे पाणी शिरले -

ललबकैया नदीच्या पुरामुळे चंपारणमधील आणि गोपालगंज येथील स्थिती गंभीर होत आहे. येथील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर काही गावे देखील पुराने वेढले आहे. या गावांचा संपर्क देखील तुटला आहे. या पुरामध्ये 40 पेक्षा जास्त गावे प्रभावित झाली आहे. येथील रहिवाशांना उंच ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

बिहारमध्ये मुसळधार पाऊस

अररियाच्या एनएच - 327 ईवर 2 फुटांपर्यंत पाणी -

नेपाळच्या तराई भागात होत असलेल्या पावसामुळे अररियाच्या अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. बकरा नदीच्या पाण्यामुळे अररिया आणि बंगालला जोडणारा एनएच 327 ई या डायवर्जनवर दोन फुटांपर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - परवानगी नसताना सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चास सुरुवात; पोलिसांचा मोठा फौजफाटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.