ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा, दोन जखमी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 4:59 PM IST

Five Soldiers Martyred in Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. या घटनेत पाच जवान हुतात्मा झाले, तर अनेक जवान जखमी झाले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केलीय.

Five Soldiers Martyred in Jammu Kashmir
Five Soldiers Martyred in Jammu Kashmir

सैन्याच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा

पूंछ/जम्मू Five Soldiers Martyred in Jammu Kashmir : जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्यानं पाच जवान हुतात्मा झाले तर दोन जण जखमी झाले आहेत. अधिकार्‍यांनी सांगितलं की, सुरनकोट पोलीस ठाण्यांतर्गत ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या वळणावर शोध मोहिमेच्या ठिकाणी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. यानंतर याठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आलीय.

दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांकडून हल्ल्याचा निषेध : या घटनेनंतर गुलाम नबी आझाद आणि मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची पाकिस्तानस्थित शाखा पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) नं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मूमधील संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल सुनील बारतवाल यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबतच्या 'गुप्तचर'च्या आधारे बुधवारी रात्री पूंछ जिल्ह्यातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आलीय.

हल्ल्यात पाच जवान हुतात्मा : सैनिक घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी दोन वाहनांवर गोळीबार केला. या हल्ल्याला सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलं. चालू असलेल्या या कारवाईत पाच जवान हुतात्मा झाले असून दोन जण जखमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

आतापर्यंत 19 जवान हुतात्मा : राजौरी, पुंछ आणि रियासी जिल्ह्यांत या वर्षी झालेल्या चकमकीत आतापर्यंत 19 सुरक्षा जवान हुतात्मा झाले आहेत. तर यात 28 दहशतवादी मारले गेले आहेत. या चकमकीत एकूण 54 लोक मारले गेले आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये जंगल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये नऊ जवान हुतात्मा झाले होते. 11 ऑक्टोबर रोजी चमरेरमध्ये एका कनिष्ठ आयुक्त अधिकार्‍यासह (जेसीओ) पाच लष्करी जवान हुतात्मा झाले होते, तर 14 ऑक्टोबरला जवळच्या जंगलात एक जेसीओ आणि तीन सैनिकांनी प्राण गमावले होते.

हेही वाचा :

  1. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याच्या गाडीवर हल्ला; 3 जवान हुतात्मा
  2. Jammu Kashmir Encounter : सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; शोपियानमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.