ETV Bharat / bharat

Five Bangladeshi Arrested : बनावट कागदपत्रांसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

author img

By

Published : Dec 11, 2022, 9:36 PM IST

कानपूर शहर पोलिसांनी पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 14.56 लाख रुपये आणि बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. आरोपींना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (Bangladeshi arrested from Kanpur). (Five Bangladeshi arrested with fake documents).

Etv Bharat
Etv Bharat

पोलिस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी

कानपूर (उत्तर प्रदेश) : शहरात पुन्हा एकदा बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी समोर आली आहे. कानपूर पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांगलादेशी नागरिक रिझवान मोहम्मद याला मूळगंज पोलीस स्टेशन परिसरातून अटक केली आहे. रिझवानशिवाय खालिद मजीद, रिझवानची पत्नी हिना खालिद, रुखसार रिझवान आणि एका अल्पवयीन गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. (Bangladeshi arrested from Kanpur). (Five Bangladeshi arrested with fake documents).

बनावट कागदपत्र जप्त : पोलिस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले की, रिझवान कडे जे व्हिजिटींग कार्ड मिळाले त्यात त्याने एमबीबीएस असल्याचे दाखवले आहे. मात्र, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रिझवानने आपल्या पत्नीसोबत बनावट कागदपत्रांच्या मदतीने बांगलादेशसह इतर अनेक देशांमध्ये प्रवास केला होता. याप्रकरणी त्याची पत्नी हिना हिलाही अटक करण्यात आली आहे. एकूण ५ आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या सर्व कामाची माहिती गोळा केली जात आहे.

देशविरोधी कारवाईचा संशय : रिझवानकडून 14.56 लाख रुपयांच्या रोकडसह अनेक आधार कार्ड, विदेशी चलन आणि इतर कागदपत्रे सापडली आहेत. हे संपूर्ण प्रकरण देशविरोधी कारवायांशी संबंधित आहे, त्यामुळे त्याची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असे पोलीस सहआयुक्तांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती अनेक गुप्तचर यंत्रणांना देण्यात आली असून, त्याच्या आधार कार्डसह इतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

रिझवानच्या उत्तरांवर पोलीस असमाधानी : पोलीस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले की, रिझवानला तो बांगलादेशात कसा पोहोचला असे विचारले असता तो उत्तर देऊ शकला नाही. त्याने सांगितले की, तो पत्नी हिनासोबत दिल्लीमार्गे प्रथम पश्चिम बंगालला पोहोचला. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करत त्याने बांगलादेश गाठले. आधी तो बांगलादेश, नंतर मलेशिया आणि नंतर नेपाळला गेला. त्यानंतर ते कानपूरला आले. गुप्तचरांनी कानपूर पोलिसांना रिझवानच्या कारवायांची माहिती दिली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा तपास करत होते. याप्रकरणी अजून बरीच माहिती समोर यायची आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रिझवानने जे सांगितले त्यावर अधिकारी समाधानी नाहीत. त्याची चौकशी सुरू आहे.

सपा आमदाराने भारतीय असल्याचा दाखला दिला होता : या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सपा आमदार इरफान सोलंकी आणि सपा काऊन्सिलर मन्नू रेहमान यांनी त्यांच्या लेटरपॅडवर या बांगलादेशी तरुणांना भारतीय असल्याचा दाखला दिला होता. अटक झालेल्यांकडून प्रत्येकी दोन पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.