ETV Bharat / bharat

महिला प्रवासी रेल्वे स्टेशनवर अचानक पडली बेशुद्ध , पर्यटनाला आलेल्या ऑस्ट्रेलियन डॉक्टरनं 'गोल्डन अवर'मध्ये वाचवले प्राण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 7:22 AM IST

Updated : Nov 23, 2023, 4:16 PM IST

Australian woman save life in gaya
गयामध्ये ऑस्ट्रेलियन महिलेनं जीव वाचवला

Australian woman save life in gaya : डॉक्टर हे देवाचे रूप असल्याचं म्हंटलं जातं. याचं जिवंत उदाहरण गया येथे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियन पर्यटक महिलेनं रेल्वे स्ठानकावर महिला रुग्णाचे प्राण वाचवले.

गया (Australian woman save life in gaya) : मानवतेला देशाच्या सीमांची बंधने नसतात, याचं उदाहरण बिहारमधील गया रेल्वे स्थानकावर पाहायला मिळालं. महिला प्रवासी अचानक प्लॅटफॉर्मच्या मजल्यावर कोसळली. यावेळी तिच्याबरोबर नातेवाईक होते. प्लॅटफॉर्मच्या मजल्यावर पडलेल्या महिलेच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. काही वेळातच तिची प्रकृती अधिकच बिघडली. आजारी महिलेला पाहून तेथे उपस्थित ऑस्ट्रेलियन पर्यटक महिलेनं तातडीनं तिच्यावर उपचार सुरू केले. या ऑस्ट्रेलियन महिलेचं नाव सोरोया एनी असून त्या डॉक्टर आहेत.

बेशुद्ध महिला पूर्णपणे सुरक्षित : गंभीर झालेल्या महिलेची प्रकृती ऑस्ट्रेलियन महिलेकडून तातडीनं वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आता पूर्णपणे स्थिर आहे. सध्या या आजारी महिलेवर मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गया रेल्वे स्थानकावर ऑस्ट्रेलियातील काही पर्यटक महिला उपस्थित होत्या. यावेळी अचानक एक महिला खाली पडली. आजारी महिलेला पाहून डॉक्टर असलेल्या ऑस्ट्रेलियन महिलेनं तातडीनं तिच्यावर उपचार सुरू केले. तत्काळ प्राथमिक उपचार केल्यानंतर महिलेला रेल्वे रुग्णालयानंतर मगध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, जिथं तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येतंय. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियातील महिलेनं केलेल्या मदतीमुळं एका महिलेचे प्राण वाचले.

गया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली घटना : मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (22 नोव्हेंबर) छोटकी देल्हा लोकलमध्ये राहणारी सुमन कुमारी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पडली होती. यावेळी स्टेशन मास्तरांना आरपीएफनं वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टर अन् रुग्णवाहिका बोलवण्याची सूचना दिली. मात्र, महिलेच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. जेव्हा गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. तेव्हा ऑस्ट्रेलियातील काही पर्यटक महिलांमध्ये असलेल्या सोरोया एनी यांनी डॉक्टर म्हणून लगेच कर्तव्य बजाविले. त्यांनी ताबडतोब त्या महिलेला वैद्यकीय मदत सुरू केल्यानंतर महिलेला बरे वाटू लागले. त्यानंतर पूर्वकाळजी म्हणून रेल्वे संरक्षण दलानं स्ट्रेचरनं महिलेला रुग्णालयात नेलं.

"गया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आलेली महिला आजारी होती. अचानक जमिनीवर पडली. तिच्यावर ऑस्ट्रेलियातील एका महिलेनं उपचार केले. ऑस्ट्रेलियन महिलेच्या मदतीनं प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर लगेचच रेल्वे रुग्णालयानंतर आता सदरील महिलेला मगध मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. रेल्वे संरक्षण दलाची तत्परताही वाखाणण्याजोगी होती.'' - आरपीएफ अधिकारी .

हेही वाचा -

  1. Ashok Choudhary On Amit Shah : बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर वादग्रस्त विधान
  2. Bihar Train Accident : 'अचानक धक्का बसला अन्...', ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितली आपबिती, आतापर्यंत ४ ठार
  3. Bihar Train Accident : बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात, नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली; आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू
Last Updated :Nov 23, 2023, 4:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.