Fatwa Aganist Muslim Doctor : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर फुलांचा वर्षाव करणाऱ्या मुस्लीम डॉक्टरविरोधात फतवा

author img

By

Published : Apr 6, 2022, 3:34 PM IST

Fatwa Issued Against Muslim Doctor

मुरादाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( Fatwa Aganist Muslim Doctor In Muradabad ) पथसंचलनावर फुलांचा वर्षाव करणाऱ्या मुस्लीम डॉक्टविरोधात फतवा काढल्याची घटना समोर आली आहे. हा फतवा जारी करणाऱ्या हाफिज इम्रान वारसीविरुद्ध ( FIR Against Hafij Imran ) गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

मुरादाबाद - मुरादाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( Fatwa Aganist Muslim Doctor In Muradabad ) पथसंचलनावर फुलांचा वर्षाव करणाऱ्या मुस्लीम डॉक्टरवर फतवा काढल्याची घटना समोर आली आहे. हा फतवा जारी करणाऱ्या हाफिज इम्रान वारसीविरुद्ध ( FIR Against Hafij Imran ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत हाफिज इम्रानला अटक केली आहे.

प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण - मुरादाबादच्या महमूदपूर गावात 2 एप्रिल रोजी भाजपशी संबंधित डॉ. निजाम भारती यांनी आरएसएसच्या पथ संचलनावर पुष्पवृष्टी केली होती. त्यानंतर डॉ. निजाम भारती यांची हत्या करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असा फतवा जाहीर करण्यात आला. इतकेच नाही तर, फतव्यात रमजानच्या महिन्यात त्यांना मशिदीत जाऊ देऊ नये, त्यांना मारून टाकावे आणि मशिदीतून पळून गेलेल्यांना एक लाख रुपये द्यावेत, असेही फतव्यात नमूद करण्यात आले आहे. ही फतवा पत्रिका गावातील मशिदी आणि दुकानांमध्ये वाटली गेली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपी हाफिज इम्रानला अटक केली आहे.

डॉ. निजाम भारती यांच्या विरोधात फतवा पत्रिका वाटल्याने संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे. निजाम भारती यांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याचे म्हटले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी करणे, हे त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा - Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.. चर्चांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.