ETV Bharat / bharat

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, डॉलरच्या किमती वाढल्याचा परिणाम

author img

By

Published : Jun 2, 2022, 9:36 AM IST

Gold Price Today
Gold Price Today

जागतिक शेअर बाजारात मंदी दिसून येत आहे, तर सराफा बाजारातही सुरुवातीच्या सत्रात फारशी गती दिसलेली नाही. ( gold and silver prices ) तर चांदीच्या दरातही घसरण होत आहे. डॉलरच्या किमतीच्या वाढीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.48 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई - आज जागतिक शेअर बाजारात मंदी दिसून येत आहे, तर सराफा बाजारातही सुरुवातीच्या सत्रात फारशी गती दिसलेली नाही. तर चांदीच्या दरातही घसरण होत आहे. डॉलरच्या किमतीच्या वाढीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.48 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.11 टक्क्यांनी घसरून आज 22 कॅरेट सोन्याचे दर 47,804 प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरातही किंचित घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 62,680 रूपयांवर व्यवहार करत आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 52,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.

  • तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर
शहरसोने1 किलो चांदीचा दर
मुंबई 47,71362,560
पुणे47,71362,560
नाशिक 47,71362,560
नागपूर47,71362,560
दिल्ली47,63062,450
कोलकाता 47,64862,480

तुमच्या शहराचे दर तपासा - तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा - तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

हेही वाचा - राज्यात मोसमी पाऊस जोरदार बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.