ETV Bharat / bharat

Fake PMO Official : स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी सांगणारा आणखी एक तोतया गुजरात पोलिसांच्या जाळ्यात

author img

By

Published : Jun 24, 2023, 8:18 PM IST

गुजरातमध्ये पीएमओ अधिकारी बनून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. विद्यापीठात संशोधनाच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्याच्या उद्देशाने त्याने फसवणूक केली होती.

Fake PMO Official
खोटा पीएमओ अधिकारी बनून फसवणूक

वडोदरा (गुजरात) : वडोदरा पोलिसांनी पीएमओ (PMO) अधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले आहे. मयंक तिवारी नावाच्या या व्यक्तीने स्वत:ला पीएमओ मधील धोरणात्मक सल्लागार संचालक असल्याचा खोटा दावा करून एका स्कूलमध्ये प्रवेश मिळवला होता.

संशोधनाच्या नावाखाली फसवणूक : मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव मयंक तिवारी आहे. त्याने पीएमओ कार्यालयात कोणतेही पद नसताना स्वत: डायरेक्ट गव्हर्नमेंट अ‍ॅडव्हायझरी म्हणून काम करत असल्याचे खोटे दाखवले. मयंक तिवारीने त्याच्या सोशल मीडिया स्टेटस आयकॉनमध्ये बेकायदेशीरपणे अशोक स्तंभाचा लोगो लावला होता. गुजरातमध्ये शिक्षणाच्या नावाखाली संशोधन करण्यासाठी त्याने पारुल विद्यापीठ आणि न्यू एरा स्कूलच्या प्रशासकांना ही खोटी माहिती दिली होती. संशोधनाच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्याच्या उद्देशाने त्याने फसवणूक केली. या व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

डायरेक्ट गव्हर्नमेंट अ‍ॅडव्हायझरी अशी ओळख सांगितली : मार्च 2022 मध्ये शाळेत प्रवेश प्रक्रियेदरम्यान मयंक तिवारीने स्वत:ची ओळख पीएमओ कार्यालयाचे संचालक धोरणात्मक सल्लागार म्हणून केली. त्याने त्याच्या मित्राच्या मुलांच्या प्रवेशासाठी संपर्क साधला. संचालकाने त्याला शाळेचे विश्वस्त देवांशू पटेल यांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर मयंक तिवारी पारुल विद्यापीठात गेला. गीतिका पटेल यांच्याशी संभाषण करताना, त्याने आपली पीएमओ डायरेक्ट गव्हर्नमेंट अ‍ॅडव्हायझरी अशी ओळख करून दिली. त्याने सांगितले की तो दिल्ली पीएमओ कार्यालयात काम करत आहे.

आरोपीला तत्काळ अटक : मयंक तिवारी याची प्रशासकांनी वैयक्तिक तपासणी केली. त्यानंतर तो पंतप्रधान कार्यालयात काम करत नसल्याची माहिती मिळाली. मयंक परशुराम तिवारी असे त्याचे नाव असून तो 13 पंचलधाम सोसायटी, न्यू समा रोड, वडोदरा, नवरंग सोसायटीच्या पुढे राहतो. ही माहिती दोन दिवसांपूर्वी शाळा संचालकांना देण्यात आली. यानंतर तक्रारदार झालेले प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर राधेश्याम दधिचे यांनी व्यवस्थापनाच्या वतीने वाघोडिया पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा :

  1. Kiran Patel Fake PMO Officer : गुजरातच्या व्यक्तीचा असाही प्रताप! बनावट पीएमओ अधिकारी बनून घेतली झेड प्लस सुरक्षा!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.