ETV Bharat / bharat

अरुण जेटली मेमोरियलचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते उद्घाटन, वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

author img

By

Published : Sep 26, 2021, 6:43 AM IST

Updated : Sep 26, 2021, 6:51 AM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

मुंबई - अरुण जेटली मेमोरियलचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर एकाच मंचावर असणार आहेत.

औरंगाबाद - जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद

औरंगाबाद - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे बांधकाम विभागाची बैठक घेणार आहेत.

कोल्हापूर - रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत हे रविवारी (दि. २६ सप्टेंबर) कोल्हापूर येथे ऊस एफआरपी (FRP) च्या पत्रकार परिषद घेणार आहेत.

दिल्ली - भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळ उत्तर आंध्र प्रदेशमधील कलिंगपट्नम व दक्षिण ओडीशातील गोपालपूरमध्ये धडकण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवसांत काही ठिकाणी मुसळधार होण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तवलि आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

रत्नागिरी - राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होतील. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, येत्या आठ दिवसांत त्याबाबत अहवाल तयार होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी तयारीत राहावे असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, अहवाल आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांना दाखवला जाईल आणि त्यांच्या आदेशान्वये किती टक्के फिजिकली प्रेझेंटीवर महाविद्यालय सुरू करायची त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे कॉलेज आता सुरू होणार या मानसिकतेमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी राहावे असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा ...

ठाणे - एका ३० वर्षीय विवाहतेच्या घरात घुसून २८ वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सविस्तर वाचा ...

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी (दि. 25) 3 हजार 276 रुग्ण आढळून आले आहेत. 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3 हजार 723 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.24 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा ...

मुंबई - कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाबाबत चिंता वाढविणारी महत्त्वाची बातमी आहे. धारावी परिसरात शाळेच्या ऑनलाईन शिकवणी वर्गामध्ये अज्ञाताने घुसखोरी करत अश्लील व्हिडीओ सुरू केला. शिकवणी वर्ग सुरू असताना या स्वरुपाचे व्हिडीओ सुरू झाल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांना धक्का बसला. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा ...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य -

26 सप्टेंबर राशीभविष्य : धनु राशीसाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

VIDEO : 26 सप्टेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राशीभविष्य : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराणा यांच्याकडून

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

Last Updated :Sep 26, 2021, 6:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.