ETV Bharat / bharat

Rickshaw Driver Returned Bag of Money: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; 25 लाख रुपयांची सापडलेली बॅग पोलिसांकडे सोपविली

author img

By

Published : Feb 8, 2023, 9:34 AM IST

Example Of Honesty
रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे उदाहरण मांडले

गाझियाबादमधील एका रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे. एका तलावाजवळून जात असताना रिक्षाचालकाची नजर 25 लाख रुपये असलेल्या बॅगेवर पडली, मात्र कोणताही लोभ न दाखवता त्याने ती बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकारी

नवी दिल्ली : गाझियाबादमधील एका रिक्षाचालकाने आपल्या कृतीतून प्रामाणिकपणाचे उदाहरण मांडले आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्यक्षात एका गरीब रिक्षाचालकाला तलावाच्या काठावर 25 लाख रुपयांनी भरलेली बॅग सापडली. रिक्षाचालकाने दुसऱ्या व्यक्तीला फोन करून पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी रिक्षाचालकाचे खूप कौतुक केले आणि बॅग ताब्यात घेतली. त्यांच्या या प्रामाणिकपणाची शहरात विविध ठिकाणी चर्चा होत आहे.

पोलिसांनी रिक्षाचालकाचा केला सन्मान : हे प्रकरण गाझियाबादच्या मोदीनगर पोलीस स्टेशन हद्दीशी संबंधित आहे. ई-रिक्षाचालक आस मोहम्मद हे रिक्षाने येथून जात असताना तिबरा रोडजवळील तलावाच्या काठावर पडलेल्या एका बॅगेवर त्यांची नजर पडली होती. दरम्यान, आस मोहम्मदने त्याचा एक ओळखीचा सर्फराज अलीला जाताना पाहिले. दोघांनीही यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली. रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पाहून डीसीपी ग्रामीण रवी कुमार यांनीही त्याचा गौरव केला आहे.

बॅगच्या मालकाचा शोध सुरू : हा सगळा पैसा कोणाचा होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बॅगच्या मालकाचा शोध घेत आहेत. यासोबतच या प्रकरणाचा कोणत्याही संशयास्पद हालचालींशी संबंध नाही ना याचीही खातरजमा केली जात आहे. एवढी मोठी रक्कम पाहिल्यानंतर कोणाच्याही मनात लोभ आला असता, मात्र प्रामाणिकपणा दाखवत गरीब रिक्षावाल्याने ही रक्कम पोलिसांच्या हवाली केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. आस मोहम्मदचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डीसीपी ग्रामीण रवी कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती आयकर विभागालाही देण्यात आली आहे.

डिसेंबरमधील घटना : हल्दवानी येथील मुखानी येथे लग्न होते, वधूच्या कुटुंबीयांनी 6 लाखांचे दागिने खरेदी केले होते. ते लोक रिक्षाने बँक्वेट हॉलमध्ये पोहोचले होते. परंतु दागिन्यांची बॅग ऑटोमध्येच विसरली होती. त्यानंतर ऑटोचालकाने दागिन्यांची बॅग परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला होता. त्यामुळे वधू पक्षाच्या लोकांनी कीर्ती बल्लभ यांचे फुलांच्या हाराने स्वागत केले होते. दागिने गायब झाल्याने विवाह सोहळ्यात एकच गोंधळ उडाला होता. जेथे वधूपक्षातील लोकांनी कृती बल्लभ यांचे फुलांच्या हाराने स्वागत केले होते.

हेही वाचा : Mumbai Crime: शाब्बास पोलिसांनो! डॉक्टर, नर्स बनून आरोपीला पकडले; अन् दगडांच्या वर्षावात 800 मीटर खेचत नेले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.