ETV Bharat / bharat

LPG cylinder price hike : दिलासा नाहीच! घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले, आता 'ही' आहे किंमत

author img

By

Published : May 19, 2022, 8:52 AM IST

Updated : May 19, 2022, 9:02 AM IST

आज, गुरुवारी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ ( LPG cylinder price hike ) करण्यात आली. आता देशभरात घरगुती एलपीजी ( LPG cylinder price news ) सिलिंडरच्या किमती 1 हजार रुपयांच्या ( Domestic LPG gas cylinder price ) पुढे गेल्या आहेत. आज घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 3.50 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, व्यावसायिक गॅस सिलिंडर 8 रुपयांनी महागला आहे.

gas cylinder
गॅस सिलेंडर

नवी दिल्ली - देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. आज, गुरुवारी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ ( LPG cylinder price hike ) करण्यात आली. आता देशभरात घरगुती एलपीजी ( LPG cylinder price news ) सिलिंडरच्या किमती 1 हजार रुपयांच्या ( Domestic LPG gas cylinder price ) पुढे गेल्या आहेत. आज घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 3.50 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, व्यावसायिक गॅस सिलिंडर 8 रुपयांनी महागला आहे.

हेही वाचा - Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरण : न्यायालयात आज सादर होणार सर्व्हे रिपोर्ट.. सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 3 रुपये 50 पैशांनी वाढ - आजपासून दिल्ली आणि मुंबईमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 1 हजार 3 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एका वर्षांत दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1 हजार 3 रुपयांवर गेला आहे. आज एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1 हजार 29 रुपये आणि चेन्नईमध्ये 1 हजार 18.5 रुपये झाली आहे. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

यापूर्वी 7 मे रोजी दरात वाढ करण्यात आली होती - याआधी 7 मे 2022 रोजी देशात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती आणि त्यावेळी प्रति सिलेंडर 50 रुपयांची प्रचंड वाढ झाली होती. मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी, आज व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही 8 रुपयांनी महागली आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत (14.2 किलोग्राम) -

दिल्ली - 1003 रुपये प्रति सिलेंडर

कोलकाता - 1029 रुपये प्रति सिलेंडर

मुंबई - 1002.50 रुपये प्रति सिलेंडर

चेन्नई - 1018.50 रुपये प्रति सिलेंडर

19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत पुढील प्रमाणे -

दिल्ली - 2354 रुपये प्रति सिलेंडर

कोलकाता - 2454 रुपये प्रति सिलेंडर

मुंबई - 2306 रुपये प्रति सिलेंडर

चेन्नई - 2507 रुपये प्रति सिलेंडर

हेही वाचा - Gyanvapi Report : ज्ञानवापी मशिदीच्या भिंतींवर शेषनाग, देवी-देवतांच्या कलाकृती..? रिपोर्टमध्ये दावा..

Last Updated : May 19, 2022, 9:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.